शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात स्थायिक झालेले गोमंतकीय फेस्तानिमित्त गोव्यात परतायला सुरूवात, नोव्हेनाला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 13:30 IST

सेंट झेवियर्स फेस्त हे गोव्यातील ख्रिस्ती धर्मियांचे सर्वात मोठे फेस्ट म्हणजेच जत्रा मानली जाते. फेस्तनिमित्ताने जुनेगोवे येथील प्रसिद्ध चर्चमध्ये नोव्हेनांना (प्रार्थना) आरंभ झाला आहे.

पणजी- सेंट झेवियर्स फेस्त हे गोव्यातील ख्रिस्ती धर्मियांचे सर्वात मोठे फेस्ट म्हणजेच जत्रा मानली जाते. फेस्तनिमित्ताने जुनेगोवे येथील प्रसिद्ध चर्चमध्ये नोव्हेनांना (प्रार्थना) आरंभ झाला आहे. उद्योग-व्यवसायाच्यानिमित्ताने बाहेरगावी गेलेल्या तसंच दुनियेच्या कानाकोपऱ्यात स्थायिक झालेले ख्रिस्ती धर्मिय गोमंतकीय बांधव फेस्तनिमित्ताने गोव्यात परतू लागले आहेत. जुनेगोवे येथे नोव्हेनांसाठी मोठी गर्दी झाल्याचे रोज पहायला मिळते.

नोव्हेंबरच्या अखेरीस गोव्यात फेस्टीव्ह मोसम सुरू होतो. डिसेंबर हा तर पूर्ण फेस्टीव्ह सिझनच असतो. सेंट झेवियर फेस्त आणि नाताळ सणाची धूम डिसेंबर महिना भरून राहते. गोव्यातील लाखो ख्रिस्ती धर्मिय बांधव हे विदेशात कामाधंद्यानिमित्त राहतात. त्यांचे मूळ घर गोव्यात असल्याने वर्षातून म्हणजेच फेस्तवेळी एकदा हे गोमंतकीय आपल्या मूळ घरी परततात. सेंट झेवियर म्हणजेच गोंयचो सायब. या संतावर ख्रिस्ती बांधवांची प्रचंड श्रद्धा आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस नोव्हेनांना आरंभ होतो आणि जगात विखुरलेल्या गोमंतकीय ख्रिस्ती बांधवांची पाऊले गोव्याकडे वळू लागतात. सोळाव्या शतकातील चर्चेस जुनेगोवे येथे दिमाखात उभ्या असून एका चर्चमध्ये अजुनही सेंट झेवियरचे शव राखून ठेवण्यात आले आहे. दहा वर्षानी एकदा ते बाहेर काढून ते प्रदर्शनार्थ ठेवले जाते. भाविक त्यावेळी गोंयच्या सायबाचे दर्शन घेतात.

सेंट झेवियरचे भक्त असलेले आणि नोव्हेंनामध्ये भाग घेणारे एक ज्येष्ठ ख्रिस्ती बांधव ट्रोजन डिमेलो यांनी लोकमतला सांगितले, की विदेशात असलेले ख्रिस्ती बांधव फेस्तनिमित्ताने हमखास गोव्यात येतातच. येत्या 4 डिसेंबर रोजी फेस्त साजरे होणार आहे. त्यावेळी जुनेगोवेत अभूतपूर्व गर्दी उसळेल. लाखो भाविक आणि लाखो पर्यटक यानिमित्ताने जुनेगोवे येथील चर्चला भेट देतात. काही ख्रिस्ती बांधव डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गोव्यात दाखल होतील, तर बहुतेकजण आताच गोव्यात दाखल होऊ लागले आहेत. काहीजण फेस्त होताच पुन्हा विदेशात परततात तर अनेकजण गोव्यात राहून नाताळ साजरा करतात. नववर्षही साजरे करतात व मग परततात.जुनेगोवे येथील चर्चच्या परिसरात सध्या मोठा मांडव घालण्यात आला आहे. सुरक्षेच्यादृष्टीने गोवा सरकारने सगळी व्यवस्था केली आहे. जुनेगोवे येथे रोज हजारो पर्यटक सध्या येत आहेत. तेथील अंतर्गत वाहतूक रचना बदलण्यात आली आहे. वाहतूक पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित असले तरी, वाहतुकीचा प्रचंड गोंधळही तिथे अनुभवास येत आहे. कारण रस्त्यांची नीट कल्पना नसल्याने वाहने आत आणणारे पर्यटक गोंधळून गेलेले असतात.