शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

गोव्यातील रस्ता कर कपात वादाच्या भोवऱ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 11:04 AM

गोव्यातील नव्या वाहनांसाठी सरकारने 50 टक्के रस्ता कर कपात केल्यामुळे विविध राजकीय पक्षांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देगोव्यातील नव्या वाहनांसाठी सरकारने 50 टक्के रस्ता कर कपात केल्यामुळे विविध राजकीय पक्षांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यांच्या दुर्दशेवर सरकारने चर्चा केली नाही, त्याऐवजी ऑटोमोबाईल डिलरांना सरकारने प्राधान्य दिले - विजय सरदेसाई31 डिसेंबरपर्यंतच म्हणजे तीन महिन्यांसाठी नव्या वाहनांकरीता रस्ता कर कपात लागू आहे.

पणजी - गोव्यातील नव्या वाहनांसाठी सरकारने 50 टक्के रस्ता कर कपात केल्यामुळे विविध राजकीय पक्षांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. रस्ता कर कपाती मागील सरकारचा नेमका हेतू काय आहे हे स्पष्ट झालेले नाही. अचानक आणि काहीशा घाईगडबडीत करण्यात आलेली ही कपात सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

गोव्यातील वाहतूक खात्याकडून दरवर्षी एकूण 181 कोटींचा रस्ता कर वाहनांकडून गोळा केला जातो. रस्त्यांवरील खड्डे आणि वाढते वाहन अपघात यामुळे अगोदरच गोवा सरकार जहरी टीकेचे लक्ष्य बनलेले आहे. गेले तीन महिने सोशल मीडियावरून सरकारविरोधात समाजाच्या सर्वच स्तरांतील लोक सरकारवर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर गोवा मंत्रिमंडळाने तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला नाही. त्याऐवजी नव्या वाहनांसाठी रस्ता करात पन्नास टक्के कपात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. अशा प्रकारचा निर्णय घेण्याची मागणी वाहन चालकांनी केली नव्हती. तरी देखील वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी रस्ता कर कपात करून घेण्याबाबत घाई का केली असावी असा प्रश्न अन्य काही मंत्र्यांना व विरोधी काँग्रेस व गोवा फॉरवर्ड पक्षालाही सध्या पडला आहे.

रस्त्यांच्या दुर्दशेवर सरकारने चर्चा केली नाही, त्याऐवजी ऑटोमोबाईल डिलरांना सरकारने प्राधान्य दिले, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री व गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे. तसेच वाहतूक मंत्री गुदिन्हो यांनी मात्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. देशभरच ऑटमोबाईल उद्योगात मंदी आहे. गोव्यातही वाहन नोंदणीचे प्रमाण खाली आले आहे. ते प्रमाण वाढावे म्हणून रस्ता करात कपात करावी लागली, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना गुदिन्हो यांचा हा युक्तीवाद पटलेला नाही. येत्या 31 डिसेंबरपर्यंतच म्हणजे तीन महिन्यांसाठी नव्या वाहनांकरीता रस्ता कर कपात लागू आहे. वाहनांसाठी पन्नास टक्के रस्ता कर माफ असेल. म्हणजेच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी फक्त 50 टक्के रस्ता कर लागू होणार आहे. 

 

टॅग्स :goaगोवाroad transportरस्ते वाहतूक