Goa Election 2022 : भाजपची पहिली यादी जाहीर, प्रमोद सावंत साखळीतून लढणार; उत्पल यांना पणजीतून उमेदवारी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 01:10 PM2022-01-20T13:10:11+5:302022-01-20T13:10:31+5:30

Goa Election 2022 : गोव्यातील ४० पैकी ३४ जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा.

Goa Election 2022 BJPs first candidates list announced in Goa Pramod Sawant to contest from chain, Utpal Parrikar has no candidature | Goa Election 2022 : भाजपची पहिली यादी जाहीर, प्रमोद सावंत साखळीतून लढणार; उत्पल यांना पणजीतून उमेदवारी नाकारली

Goa Election 2022 : भाजपची पहिली यादी जाहीर, प्रमोद सावंत साखळीतून लढणार; उत्पल यांना पणजीतून उमेदवारी नाकारली

Next

गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, बहुतांश पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली होती. परंतु भाजप कोणत्या उमेदवारांना संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. गोव्यामध्ये भाजप आणि उत्पल पर्रीकर यांचा मुद्दा फार गाजत आहे. दरम्यान, भाजप उत्पल पर्रीकर यांना संधी देणार का याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. भाजपनं गुरूवारी आपली पहिली यादी जाहीर केली. यामध्ये गोव्यातील ४० पैकी ३४ जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 

भाजपचे राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंग यांची ४० पैकी ३४ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे साखळी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे भाजपनं माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांना मात्र पणजीतून उमेदवारी नाकारली आहे.


दरम्यान, पणजी विधानसभा मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी उत्पल पर्रीकर यांनी केली होती. परंतु भाजपनं पणजीतून बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी जाही करण्यात आली आहे. आता यानंतर उत्पल पर्रीकर काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. "पणजीत जे विद्यमान आमदार आहेत, त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. उत्पल पर्रीकर आणि त्यांचं कुटुंब आमच्या जवळीलच आहे. त्यांना दोन जागांचा पर्याय दिला होता. त्यापैकी एका जागेला त्यांनी यापूर्वीच नकार दिला होता. परंतु दुसऱ्या जागेसंदर्भात चर्चा सुरू आहे. भाजपनं कायमच पर्रीकरांच्या कुटुंबाचा सन्मान केला आहे," असं ते म्हणाले.

Web Title: Goa Election 2022 BJPs first candidates list announced in Goa Pramod Sawant to contest from chain, Utpal Parrikar has no candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.