शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 23:08 IST

Goa CMO Trending News: राणे यांनी या डॉक्टरांना गरीबांवर उपचार करत नसल्याच्या तक्रारीवरून झापले होते. यात मोठा ट्विस्ट आला आहे.

गोव्यात बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात येत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले होते. यावेळी राणे यांनी या डॉक्टरांना गरीबांवर उपचार करत नसल्याच्या तक्रारीवरून झापले होते. यात मोठा ट्विस्ट आला आहे. राणे यांनी शनिवारी या डॉक्टरचे निलंबन केले होते, तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हे निलंबन आज रद्द केले आहे. 

रुग्णाला घेऊन आलेल्या नातेवाईकाच्या फोनवरून राणे यांनी ही कारवाई केली होती. गोमेकॉत आलेल्या रुग्णाला शहर आरोग्य केंद्रात जाण्यास सांगण्यात आले होते. यावर संतापलेल्या राणे यांनी डॉ. राजेश पाटील यांना फैलावर घेत त्यांना चालते व्हा असे सांगितले होते. तसेच जे काही स्पष्टीकरण द्यायचेय ते चौकशी समितीसमोर द्या, असेही म्हणत आपल्यासोबतच्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना दुसरा सीएमओ नियुक्त करा, यांचे आजचे आज निलंबन करा असे आदेश दिले होते. 

यावरून अखिल भारतीय वैद्यकीय महासंघाने नाराजी व्यक्त केली होती. तसेच संपाचा इशारा दिला होता. मंत्र्यांनी डॉक्टरांना ज्या प्रकारे वागणून दिली ती अत्यंत चुकीची आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी संबंधित डॉक्टरची माफी मागावी, अन्यथा संपाचा इशारा महासंघाने दिला आहे. या प्रकरणात पारदर्शी चौकशी व्हावी तसेच इस्पितळाच्या आपत्कालीन विभागात बिगर वैद्यकीय व्यक्तींच्या प्रवेशास मज्जाव करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, अशी मागणी महासंघाने केली आहे. यावरून आज मुख्यमंत्री सावंत यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून आज पाटील यांचे निलंबन रद्द केले आहे. 

राणे यांच्यावर टीका झाली तेव्हा त्यांनी मी एका ज्येष्ठ महिलेची बाजू घेतली. तिला योग्य वागणूक न मिळाल्याने मी संतापलो, मी ज्या पद्धतीने सीनियर डॉक्टरशी संवाद साधला, त्याबाबतची जबाबदारी मी घेतो व पुन्हा अशा पद्धतीची पुनरावृत्ती होणार नाही, अशी हमी देतो असे मंत्री राणे यांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे. परंतू मी माफी मागणार नाही, असेही राणे म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत