शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वाहनांसाठी रोड टॅक्समध्ये 50 टक्के कपात, मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 12:27 IST

31 डिसेंबर्पयत ज्या नव्या वाहनांची नोंदणी केली जाईल, त्या वाहनांसाठी पन्नास टक्के रस्ता कर माफ असेल. म्हणजेच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी फक्त 50 टक्के रस्ता कर लागू होणार आहे.

 पणजी - गोव्यात येत्या दि. 31 डिसेंबर्पयत ज्या नव्या वाहनांची नोंदणी केली जाईल, त्या वाहनांसाठी पन्नास टक्के रस्ता कर माफ असेल. म्हणजेच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी फक्त 50 टक्के रस्ता कर लागू होणार आहे. गोवा मंत्रिमंडळाने बुधवारी याबाबतचा प्रस्ताव मंजुर केला.मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पर्वरी येथील मंत्रलयात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी बैठकीतील निर्णयांविषयी माहिती दिली. पुढील अडिच-तीन महिन्यांत डिसेंबर्पयत जी वाहन खरेदी व नोंदणी होणार आहे, त्यांना 1क्क् टक्के रस्ता कर भरावा लागणार नाही. देशभरच ऑटोमोबाईल क्षेत्रत मंदी आलेली आहे. वाहन खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे, त्यामुळे आम्ही वाहनांसाठी रस्ता करात सवलत देणार असल्याचे विधान गेल्या आठवडय़ात राज्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी केले होते. या प्रस्तावाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यापूर्वी आक्षेप घेतला होता. तथापि, गोवा सरकार ठाम राहिले.दरम्यान, गोवा नर्सिग संस्थेमधून ज्या बीएसस्सी शिक्षित मुली परिचारिका पदवी घेऊन बाहेर येतात, त्यांनी एक वर्ष गोवा सरकारच्या इस्पितळांमध्ये यापुढे सेवा बजावावीच लागेल. तसा निर्णयही मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. एक वर्ष सेवा बजाविण्यासाठी अशा परिचारिकांकडून लेखी हमी घेतली जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) बहुतेक परिचारिका काम करतात. तसेच अन्य सरकारी इस्पितळांमध्येही परिचारिकांना सेवेत घेतले जाते.राज्यात अनेक ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत. याविरुद्ध उपाययोजना म्हणून तीन खात्यांमध्ये अधिक समन्वयाची गरज आहे. पंचायती, पालिका, आरोग्य खात्याची यंत्रणा यांच्यात समन्वय वाढायला हवा अशा प्रकारची चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचे एका मंत्र्याने स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवाroad transportरस्ते वाहतूकTaxकर