शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Goa : गोव्यात ६० टक्के अंगणवाड्या भाड्याच्या जागेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 10:58 PM

Goa : राज्यात एकूण १,२६२ अंगणवाडी आहेत. यातील ७४० अंगणवाडी भाड्याच्या जागेत आहेत.

ठळक मुद्देगेल्या नऊ वर्षांच्या काळात फक्त पाच नव्या अंगणवाडींचे काम हाती घेण्यात आले आणि तेही अजून पूर्ण होऊ शकलेले नाही.

पणजी : गोव्यात ६० टक्के अंगणवाड्या खाजगी इमारतींमध्ये भाड्याच्या जागेत कार्यरत असून वषार्काठी तब्बल १ कोटी ६७ लाख रुपये सरकार भाड्यापोटी बाहेर काढत आहे.

या अंगणवाड्यांची तर दुर्दशा झालेली आहेच, शिवाय सरकारी जागेत कार्यरत असलेल्या अन्य ५२२ अंगणवाड्यांनाही कोणीच वाली राहिलेला नाही. पायाभूत सुविधांच्या बाबतीत तीन-तेरा झाले आहेत.

अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी अलीकडेच विधानसभेत त्यासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला मिळालेल्या लेखी उत्तरातून माहिती पुढे आली आहे, ती अशी की, राज्यात एकूण १,२६२ अंगणवाडी आहेत. यातील ७४० अंगणवाडी भाड्याच्या जागेत आहेत. गेल्या नऊ वर्षांच्या काळात फक्त पाच नव्या अंगणवाडींचे काम हाती घेण्यात आले आणि तेही अजून पूर्ण होऊ शकलेले नाही. या बांधकामांवर ५० लाख रुपये खर्च करण्यात आले.

स्वयंपाकघर, प्रसाधनगृहे,स्टोअर रूम आदींनी अंगणवाडी सुसज्ज असाव्यात यासाठी सरकारने पावले उचलल्याचे मागे महिला बालकल्याणमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. परंतु या सर्व गोष्टी फक्त कागदावरच राहिलेल्या आहेत.

अंगणवाडीमध्ये अगदीच लहान मुले येत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा असायला हव्यात. धान्यसांठा ठेवण्यासाठी अंगणवाडीमध्ये स्टोअर रूमची आवश्यकता असते. अनेक अंगणवाड्यांमध्ये ही सोय अजूनही झालेली नाही. 

टॅग्स :goaगोवाEducationशिक्षण