शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जीसीए घोटाळा - बीसीसीआयकडून पोलिसांना दस्ताऐवज सुपूर्द

By admin | Updated: June 27, 2016 22:09 IST

गोवा क्रिकेट असोसिएशन घोटाळा प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून माहिती मिळाल्यावर तसेच मंडळाचे सचीव अजय शिर्के यांची जबानी नोंदविल्यावर लगेच आरोपपत्र

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २७ -  गोवा क्रिकेट असोसिएशनशी केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून गोवा पोलिसांना देण्यात आली आहे. त्यामुळे जीसीए घोटाळा प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे. 

जीसीए प्रकरणाचा सर्व तपास जवळ जवळ पूर्ण झालेला असून पोलिसांना हवी असलेली महत्त्वाची कागदपत्रेही बीसीसीआयने पाठविली आहेत. जीसीएशी झालेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती देणारी कागदपत्रे बीसीसीआयने पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाला पाठविली आहेत. सोमवारी ही कागदपत्रांसह माहिती पोलिसांना मिळाल्याची माहिती पोलीस मुख्यालयातून देण्यात आली. 
बीसीसीआयने पाठविण्यात आलेल्या दस्ताऐवजात आॅक्टोबर २००६ मध्ये देण्यात आलेला २.८७ कोटी रुपयांच्या धनादेशाची झेरॉक्स प्रतही आहे अशी माहिती विशेष सूत्रांकडून मिळाली आहे.  या प्रकरणात आरोपत्रही लवकर ठेवण्यात येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हा विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच बीसीसीआयचे सचीव अजय शिंक्रे यांची जबानीही नोंदविण्यात येणार आहे. या प्रकरणात बहुतेक जबान्या नोंदवून झाल्या आहेत. 
आरोपपत्र ठेवण्यास पुरेसे पुरावे पोलिसांनी गोळा केले असल्याचा पोलिसांचा दावा आहे, परंतु जीसीएच्या बैठकीची इतिवृत्त वही अजून मिळाली नसल्यामुळे अडचण झाली आहे. जीसीएच्या दोन्ही इमारतींवर तसेच अटक करण्यात आलेल्या पदाधिकाºयांच्या घरांवर टाकलेल्या छाप्यांच्यावेळीही इतिवृत्त वही पोलिसांना सापडली नाही.