कला-वाणिज्य शाखेच्या चार नव्या हायर सेकंडरी

By Admin | Updated: May 29, 2014 07:17 IST2014-05-29T07:13:32+5:302014-05-29T07:17:34+5:30

पणजी : नव्या शैक्षणिक वर्षात राज्यात चार नव्या हायर सेकंडरींना मंजुरी देण्यात आली आहे.

Four new Higher Secondary Arts Commerce Chambers | कला-वाणिज्य शाखेच्या चार नव्या हायर सेकंडरी

कला-वाणिज्य शाखेच्या चार नव्या हायर सेकंडरी

पणजी : नव्या शैक्षणिक वर्षात राज्यात चार नव्या हायर सेकंडरींना मंजुरी देण्यात आली आहे. चारही उच्च माध्यमिक विद्यालये कला व वाणिज्य शाखेची असल्याने अकरावीत विज्ञान प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची मात्र परवड झाली आहे. दहावी उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण गेल्या वर्षापासून वाढले आहे. त्यामुळे हायर सेकंडरींची गरजही वाढली आहे. दहावीला या वर्षी १८,१0३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व १५,११९ उत्तीर्ण झाले. काही विषय वगळून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८५४ होती. पैकी ४६0 उत्तीर्ण झाले. शिवाय, एटीकेटी मिळालेल्या परीक्षार्थींची संख्या सुमारे १९00हून अधिक आहे. सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी आणखी काही हायर सेकंडरींची गरज आहे. सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या हायर सेकंडरी उघडण्यासाठी दहा व्यवस्थापनांचे अर्ज आले होते. पैकी पणजीतील हेडगेवार व्यवस्थापनाला तसेच वास्को, वाळपई आणि नागझर-पेडणे येथे मिळून एकूण चार ठिकाणी नव्या हायर सेकंडरींना मंजुरी देण्यात आली आहे. पणजी येथील हेडगेवार व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाणिज्य शाखेसाठी कमीत कमी ५५ टक्के कटआॅफ टक्केवारी ठेवण्यात आली असून त्यापुढील टक्केवारीधारकांचेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ३0 ते ४0 विद्यार्थ्यांचा वर्ग असेल. सध्या शहरात हेडगेवार शाळा चालते त्याच ठिकाणी वर्ग भरविले जाणार असले, तरी २0१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून कुजिरा-बांबोळी येथील नव्या इमारतीत ही हायर सेकंडरी हलविली जाईल. विज्ञान शाखेसाठी प्रवेशाच्या बाबतीत विद्यार्थ्यांसमोर टक्केवारीची मोठी स्पर्धा आहे. पणजीत ८५ टक्क्यांवर प्रवेश बंद झाल्याने काही पालक आता पर्वरी तसेच आजूबाजूच्या हायर सेकंडरींमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रवेशासाठी बुधवारीही वेगवेगळ्या हायर सेकंडरींमध्ये मोठ्या रांगा दिसून आल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Four new Higher Secondary Arts Commerce Chambers