शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शेट यांच्या दारूबंदी मागणीने भाजपमध्ये खळबळ; मंत्री-आमदारांचीही धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2024 10:38 IST

प्रेमेंद्र शेट यांनी दारूबंदीचा आग्रह धरल्याने सरकारमधील अनेक मंत्री व आमदारांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विकसित गोव्याचे स्वप्न साकार करण्यासाठी गोव्यात दारू पिण्यास बंदी लागू करावी, अशी मागणी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी अचानक केल्यामुळे मंगळवारी गोवा भाजपमध्ये खळबळच उडाली. कोणत्याच मंत्री, आमदाराने उगाच सर्व विषयांवर काहीही बोलू नये, अशा प्रकारची सूचना यापूर्वी सर्वांनाच मुख्यमंत्र्यांनी करूनदेखील प्रेमेंद्र शेट यांनी दारूबंदीचा आग्रह धरल्याने सरकारमधील अनेक मंत्री व आमदारांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

गुजरातसह काही राज्यांत दारूबंदी आहे. याच बंदीचा उल्लेख करत प्रेमेंद्र शेट यांनी गोव्यातही तशीच ती लागू करावी, असा मुद्दा त्यांनी मांडला होता. त्यास आमदार मायकल लोबो, आमदार डिलायला लोबो, आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्यासह अनेकांनी हरकत घेतली. दारूचे उत्पादन सुरू ठेवता येईल; पण गोव्यात दारू पिण्यास बंदी असावी, असे प्रेमेंद्र शेट यांनी मीडियालाही सांगितले होते. विधानसभेतही ते बोलले होते. विकसित गोव्यासाठी हे करणे गरजेचे आहे, असे शेट यांनी सुचविल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी सोमवारीच सर्व भाजप आमदारांची सकाळी बैठक घेतली होती. सनबर्न, रोमी कोंकणी किंवा अन्य वादाच्या विषयांवर आमदारांनी वादग्रस्त काही बोलू नये, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. प्रेमेंद्र शेट यांच्या मागणीनंतर मात्र भाजपलाही धक्का बसला. लगेच काल भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी शेट यांना फोन करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दारूबंदीची मागणी पक्षाने कुठेही केलेली नाही, याची कल्पना तानावडे यांनी शेट यांना दिली, असे समजते.

मद्य नाही तर पर्यटक कसे येतील

प्रेमेंद्र शेट स्वतः मद्य पीत नाहीत. पण, त्यांनी गोव्यात दारूबंदी लागू करण्याची मागणी करणे चुकीचे आहे, असे मायकल लोबो, डिलायला लोबो वगैरे म्हणाल्या. पर्यटक गोव्यात येतील तरी कशाला व रेस्टॉरंट्स वगैरे कसे चालतील, असा प्रश्न लोबो यांनी केला. आमदार दिव्या राणे यांना पत्रकारांनी विचारले असता, मद्य वगैरे पर्यटनाचाच भाग आहे. त्यामुळे पर्यटक गोव्यात येतात तेव्हा मद्य वगैरे पिणारच, असे राणे म्हणाल्या.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाBJPभाजपा