महिला स्वयंसेवी गटांना सुलभ कर्जे; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 12:57 IST2025-11-21T12:56:47+5:302025-11-21T12:57:12+5:30
मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी गोवा स्टेट रूरल लाइव्हलीहूड मिशनच्या गव्हर्निंग बॉडीची बैठक झाली.

महिला स्वयंसेवी गटांना सुलभ कर्जे; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा सरकारने राज्यातील महिला नेतृत्वाखालील स्वयंसेवी बचत गट आणि ग्रामीण उद्योगांना सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले असून, बँक कर्जप्राप्ती सुलभ करणे यांसह विविध उपाययोजना मंजूर झाल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी गोवा स्टेट रूरल लाइव्हलीहूड मिशनच्या गव्हर्निंग बॉडीची बैठक झाली. या बैठकीत गोव्यात स्वावलंबी ग्रामीण अर्थव्यवस्था उभी करण्यावर विशेष भर देण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी सोशल मीडिया 'एक्स'वर पोस्ट करून उत्पादक गट आणि ग्रामीण उद्योगांना पुढे नेण्यासाठी विस्तार, ब्रँडिंग आणि बाजारपेठेशी अधिक मजबूत दुवे बांधण्यावर लक्ष केंद्रित करणारे अनेक निर्णय अंतिम झाल्याचे सांगितले.
या गटांना बँक कर्ज सहज मिळावे यासाठी बँकांसोबत अधिक सुसंवाद वाढवणार असल्याचे त्यांनी नमूद केले. उत्पादक गटांना उत्पादनवाढ साधण्यासाठी आणि मूल्यवर्धन वाढवण्यासाठीही बैठकीत चर्चा झाली. महिला उद्योजकतेला बळ देणे आणि अर्थव्यवस्था स्वावलंबी बनवणे यास प्राधान्य आहे.