व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न नाही!

By Admin | Updated: May 29, 2014 07:17 IST2014-05-29T07:15:27+5:302014-05-29T07:17:54+5:30

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध फेसबुकवर पोस्ट टाकल्याबद्दल देऊ चोडणकर यांना अटक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न नव्हता.

Do not try to put a person on freedom! | व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न नाही!

व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न नाही!

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध फेसबुकवर पोस्ट टाकल्याबद्दल देऊ चोडणकर यांना अटक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न नव्हता. चोडणकर हे स्वत:च सत्र न्यायालयात गेले होते व तिथे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला. व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा सरकार मुळीच प्रयत्न करत नाही, असे निवेदन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले. पर्रीकर म्हणाले की, देऊ चोडणकर याची पोलिसांनी चौकशी करण्याच्या विषयात सरकारला काहीच भूमिका नाही. एका नागरिकाची तक्रार आल्यानंतर त्याबाबत पोलिसांनी एफआयआर नोंदवला. एखाद्या तक्रारीतून जर दखलपात्र गुन्हा स्पष्ट होत असेल, तर एफआयआर नोंदवावाच लागतो. एफआयआर म्हणजे फार मोठी बाब नव्हे. चोडणकर याला पोलिसांनी चौकशीसाठी समन्स पाठवले होते. तो पोलिसांसमोर आला नाही. थेट न्यायालयात गेला. एखादी व्यक्ती अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात जाते, तेव्हा पोलीस त्या जामिनास विरोध करतातच. पर्रीकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पूर्ण पराभव झाला आहे. त्यामुळे मी व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालतोय, असा आरोप त्या पक्षाने करू नये. कर्नाटक सरकारने मोदींविरुद्धच्या एका फेसबुक पोस्टबाबत पाच कॉलेज विद्यार्थ्यांना अटक केली आहे, हे अगोदर काँग्रेसने जाणून घ्यावे. स्व. बाळासाहेब ठाकरेंबाबत फेसबुकवर पोस्ट केल्यानेही एकास महाराष्ट्रात अटक झाली होती. अनेकदा काहीजणांना स्वत:च्या शेरेबाजीतील गांभीर्य समजत नाही व त्यामुळे समस्या निर्माण होते. देऊ चोडणकर याने मोदींविरुद्ध जे काही लिहिले, त्यापेक्षा जास्त आक्षेपार्ह त्यांनी माझ्याबाबत लिहिले होते. डॉ. आॅस्कर रिबेलो यांच्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाला. चोडणकर याने मात्र आवेर्तीन फुर्तादो व मी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मिळून रिबेलो यांच्या वडिलांचा अपघात घडवून आणला, अशी शेरेबाजी केली आहे. यावरून त्या व्यक्तीची मानसिक स्थिती कळून येते. (खास प्रतिनिधी)

Web Title: Do not try to put a person on freedom!