शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जि. पं. निवडणुकीबाबत न्यायालयात दाद मागणार

By admin | Updated: February 25, 2015 03:00 IST

मडगाव : आतापर्यंत विरोध झाल्याने स्थानिक पातळीवर गाजलेला जिल्हा पंचायत निवडणुकीचा वाद यापुढे न्यायालयात गाजणार आहे.

मडगाव : आतापर्यंत विरोध झाल्याने स्थानिक पातळीवर गाजलेला जिल्हा पंचायत निवडणुकीचा वाद यापुढे न्यायालयात गाजणार आहे. या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेलाच आव्हान देणारी याचिका ‘गोवाज मुव्हमेंट अगेन्स्ट पंचायत आॅर्डिनन्स’ (जीएमपीओ) या संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेण्याचे ठरविले आहे. येत्या सोमवारी ही याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. या संघटनेबरोबरच पेडणेतील एक गटही न्यायालयात जाण्याच्या तयारीत असून या गटाकडून मतदारसंघ फेररचनेला आव्हान देण्यात येणार आहे. जीएमपीओचे निमंत्रक कॅनेडी आफोन्सो यांनी ही माहिती दिली. गोवा सरकारने या निवडणुकीची जी प्रक्रिया सुरू केली आहे ती पूर्णत: बेकायदेशीर आहे. निवडणुकीच्या नियमावलीवर हरकती सुचविण्यासाठी ३ फेब्रुवारीला गोवा सरकारतर्फे जाहिरात देण्यात आली होती. यासंबंधी नंतर कुठलीही सुनावणी न घेता ५ फेब्रुवारीला या निवडणुकीच्या वटहुकूमावर राज्यपालांची सही झाली. याचाच अर्थ ज्या दिवशी जाहिरात प्रसिध्द झाली होती त्या पूर्वीच या जिल्हा पंचायत निवडणुकीचा वटहुकूम काढला गेला होता. हाच मुद्दा या याचिकेत मांडल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय या संघटनेने मतदारसंघ फेररचनेलाही हरकत घेतली आहे. यासंदर्भात गावपातळीवर जागृती करण्यासाठी लवकरच आपल्या संघटनेच्या बैठका सुरू होतील, असे आफोन्सो यांनी सांगितले. ज्या मतदारसंघात पक्षाच्या चिन्हावर कुठलाही उमेदवार निवडणूक लढवत असेल तर त्या उमेदवाराच्या विरोधात ही संघटना प्रचार करेल, असे आफोन्सो यांनी सांगितले. (प्रतिनिधी)