शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

जिल्हा पंचायत निवडणुका 15 मार्चला; सरकारकडून अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 7:37 PM

जिल्हा पंचायत निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम येत्या 15 फेब्रुवारीर्पयत राज्य निवडणूक आयोग जाहीर करणार आहे.

पणजी : राज्यातील जिल्हा पंचायतींच्या एकूण 5 मतदारसंघांसाठी येत्या 15 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. पंचायत खात्याचे सचिव संजय गिहार यांनी तारीख अधिसूचित करणारी अधिसूचना गुरुवारी जारी केली. जिल्हा पंचायत निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम येत्या 15 फेब्रुवारीर्पयत राज्य निवडणूक आयोग जाहीर करणार आहे.

पेडणो तालुक्यातील हरमल, मोरजी, धारगळ व तोरसे मतदारसंघात निवडणूक होईल. बार्देश तालुक्यातील शिवोली, कोलवाळ, हळदोणा,शिरसई, हणजुणा, कळंगुट, सुकूर, रेईश मागूश व पेन्ह द फ्रान्स जिल्हा पंचायत मतदारसंघात निवडणूक होईल. अन्य तालुक्यांतील जिल्हा पंचायत मतदारसंघ पुढीलप्रमाणो- तिसवाडी- सांताक्रुझ, ताळगाव, चिंबल, खोर्ली, सेंट लॉरेन्स. डिचोली तालुका- लाटंबार्से, कारापुर सर्वण, मये, पाळी. सत्तरी- होंडा, केरी, नगरगाव. फोंडा- उसगाव गांजे, बेतकी खांडोळा, कुर्टी, वेलिंग प्रियोळ, कवळे, बोरी,शिरोडा. सासष्टी- राय, नुवे, कोलवा, वेळ्ळी, बाणावली, दवर्ली, गिरदोली, कुडतरी, नावेली. सांगे- सावर्डे, रिवण. काणकोण- खोला, पैंगीण. मुरगाव- सांकवाळ, कुठ्ठाळी. केपे- शेल्डे, बाश्रे.

मगोप स्वबळावर लढेल : सुदिन

दरम्यान, भाजप, काँग्रेस व मगो पक्षाने आपण पक्षाच्या निशाणीवर जिल्हा पंचायत निवडणुका लढवीन हे जाहीर केले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीची आचारसंहिता 15 फेब्रुवारी रोजी लागू होईल. मगो पक्ष स्वबळावर जिल्हा पंचायत निवडणुका लढवील, असे मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी गुरुवारी जाहीर केले. मगोपच्या बैठकीत तसा ठराव घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. किती जिल्हा पंचायत मतदारसंघात उमेदवार उभे करावे ते आम्ही लवकरच ठरवू. सत्तावीस विधानसभा मतदारसंघांमध्ये मगोपच्या समित्या आहेत, असे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. काँग्रेस पक्ष प्रथमच पक्षाच्या निशाणीवर जिल्हा पंचायत निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवणार आहे. गोवा फॉरवर्डकडूनही निवडणूक लढवली जाईल.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीgoaगोवाElectionनिवडणूक