शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

बापरे वास्कोत डेंग्यूचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 18:08 IST

अडीच महिन्यांत वास्कोत चार जणांचा मृत्यू: गेल्या अडीच महीन्यात वास्कोत आढळले १६३ डेंग्यूचे संशयित रुग्ण

वास्को: गेल्या अडीच महीन्यांत वास्को व परिसराच्या भागात डेंग्युच्या संशयित रुग्णांत दिवसेंन दिवस वाढ होत आहे. या काळात ४ जणांचा डेंग्युसदृश तापाने मृत्यू झाल्याने नागरीकांत भीतीचे वातावरण आहे.

वास्को व परिसरातील भागात अनेक ठिकाणी झाडांच्या कुंड्या , नारळाच्या कवचांत, पाण्याच्या बॅरलामध्ये डेंग्यू पसरवणाऱ्या डासांची पैदास होत असल्याचे दिसून आले आहे. वास्को व परिसरात पसरणाºया डेंग्यूवर रोख लावण्यासाठी शहरी आरोग्य केंद्र तसेच संबंधित यंत्रणा विविध पावले उचलत आहेत, मात्र जोपर्यंत नागरिकांचे पूर्ण सहकार्य मिळत नाही, तोपर्यंत डेंग्यूवर रोख लावणे कठीण असल्याचे वास्को शहरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. रश्मी खांडेपारकर यांनी सांगितले.जुलै महीन्यापासून आजतागायत वास्को व परिसरातील भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यचेू रुग्ण आढळलेले आहेत. सध्या चिखली उपजिल्हा इस्पितळ तसेच काही खासगी इस्पितळांत डेंग्यू झाल्याने रुग्ण उपचार घेत असताना दिसून येत आहेत. जुलै महिन्यापासून अजूनपर्यंत वास्को १६३ डेंग्यू झालेले रुग्ण आढळल्याने नागरिकांत याबाबत मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वास्कोतील नवेवाडे, वाडे, बायणा, मंगोरहील, शहरात अशा विविध ठिकाणी डेंग्यचे रुग्ण या काळात आढळलेले असून प्रत्येक दिवशी नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहीती उपलब्ध झालेली आहे. तसेच जुलै महीन्यांपासून अजून डेंग्यूसदृश तापावर इस्पितळात उपचार घेत असताना चार जणांचा मृत्यू झालेला असून यात तीन पुरूषांचा तसेच एका महीलेचा समावेश आहे. डेंग्यू आजारात वाढ होण्याबरोबरच चार जणांना यामुळे मृत्यू आल्याने सध्या वास्को व जवळपासच्या परिसरात या विषयावरून भिती निर्माण झाली आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी वास्को शहरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. रश्मी खांडेपारकर यांना संपर्क केला असता आमच्या तसेच संबंधित विभागाचे अधिकारी डेंग्यूवर पूर्णपणे आळा आणण्यासाठी सर्व प्रकारची पावले उचलत असल्याची माहीती त्यांनी दिली. ज्या ज्या ठिकाणी डासांची पैदास होत आहे तेथे तेथे जाऊन योग्य पावले उचलण्याचे काम आरोग्य केंद्राचे अधिकारी करत असून औषधांची फवारणी, विविध ठिकाणी साचलेले पाणी खाली करणे अशा सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याची माहीती डॉ. खांडेपारकर यांनी दिली. लोकांत डेंग्यू पसरु नये यासाठी आरोग्य केंद्र संबंधित पावले उचलतच आहे. मात्र, नागरीकांचाही यासाठी पूर्ण सहयोग असणे गरजेचे असल्याचे डॉ. खांडेपारकर यांनी सांगितले. आपल्या परिसराबाहेर असलेल्या छोट्या मोठ्या वस्तंूमधे पाणी साचू नये यासाठी प्रत्येकांनी खबरदारी बाळगणे गरजेचे असून अशा प्रकारची दक्षता प्रत्येकाने घेतली नसल्यास डेंग्यूवर रोख लावणे एकेप्रकारे अशक्यच असल्याचे त्या म्हणाल्या. प्रत्येकाने आपल्या व आपल्या परिसरात राहणाºया नागरिकांच्या हितासाठी खबरदारी बाळगणे गरजेचे असून असे केले तरच डेंग्यूवर आळा आणणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या वास्को शहरातील एकंदरीत सर्वच भागात डेंग्यू पसरविणाºया डासांची विविध ठिकाणी पैदास होत असल्याचे दिसून आले असून अशा प्रकारच्या डासांना नष्ट करण्यासाठी आरोग्य केंद्र सतत पावले उचलत असून नागरिकांनीही यासाठी सहयोग करणे गरजेचे आहे. काही प्रकरणात लोकांच्या घरात असलेल्या पाण्याच्या बॅरलमध्ये सुद्धा डेंग्यू पसरवणाºया डासांची पैदास होत असल्याचे माहीती रश्मी खांडेपारकर यांनी देऊन वेळोवेळी नागरिकांनी साचलेले तसेच बॅरलमध्ये उघडे ठेवलेले पाणी रिकामी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे माहीतीत सांगितले.परिसरात डेंग्यूच्या डासांची पैदासडेंग्यू आजार पसरण्यापासून रोखण्यासाठी वेळोवेळी विविध ठिकाणी आमचे अधिकारी जेव्हा जातात त्या वेळी रस्त्यावर अथवा लोकांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या नारळाच्या कवचात साचलेल्या पाण्यात, झाडांच्या कुंडयात साचलेल्या पाण्यात, उघडयावर ठेवलेल्या बॅरलमधील पाण्यात, विविध ठिकाणी फेकण्यात आलेल्या टायरमध्ये साचलेल्या पाण्यात अशामध्ये डेंग्यू पसरवणाºया डासांची पैदास होत असल्याचे दिसून आलेले असल्याची माहिती डॉ. खांडेपारकर यांनी पुढे दिली.