Delhi tourist dies in Goa | दिल्लीतील पर्यटकाचा गोव्यात बुडून मृत्यू

दिल्लीतील पर्यटकाचा गोव्यात बुडून मृत्यू

मडगाव : दिल्ली येथील एका पर्यटकाचा गोव्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील कोलवा किनाऱ्यावर बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. उदित अगरवाल (२८) असे मयताचे नाव आहे.

उदित आपल्या मित्रांसमवेत गोव्यात सहलीसाठी आला होता अशी माहिती कोलवा पोलिसांनी दिली. मयत आपल्या मित्रांसमवेत याच भागातील एका हॉटेलात वास्तव्यास होता. रविवारी सकाळी उदीत समुद्राच्या पाण्यात उतरला असता, जोरदार लाटांच्या प्रवाहात तो पाण्यात बुडाला.

किना-यावर तैनात जीवरक्षकांनी त्याला पाण्याबाहेर काढून मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

महत्त्वाच्या बातम्या 

आमची हातमिळवणी खुपते, पण पक्ष फोडून आलेले चालतात; भाजपाला उद्धव ठाकरेंचा टोला

मनसेच्या प्रस्तावित मार्गाला पोलिसांनी नाकारली परवानगी, आता या मार्गावरून निघणार मोर्चा

'...तर असं हिंदुत्व स्वीकारायला तयार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

...अन् उद्धव ठाकरे कात्रीत सापडले; सांगितला युतीत ओढवलेला प्रसंग

महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा नाटकी होता; भाजपा खासदाराचे वक्तव्य

China Coronavirus : धक्कादायक! चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या भीतीने पाळीव प्राण्यांना घराबाहेर फेकलं
 

Web Title: Delhi tourist dies in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.