China Coronavirus : धक्कादायक! चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या भीतीने पाळीव प्राण्यांना घराबाहेर फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 08:37 AM2020-02-03T08:37:22+5:302020-02-03T08:41:57+5:30

चीनमधील लोक आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना घरातून बाहेर फेकत असल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.

China Coronavirus Pets thrown from towers after coronavirus rumours | China Coronavirus : धक्कादायक! चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या भीतीने पाळीव प्राण्यांना घराबाहेर फेकलं

China Coronavirus : धक्कादायक! चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या भीतीने पाळीव प्राण्यांना घराबाहेर फेकलं

Next
ठळक मुद्देचीनमध्ये पाळीव प्राण्यांना घराबाहेर काढल्याच्या घटना घडल्या आहेत.पाळीव प्राणी रक्ताने माखलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडले आहेत. चीनमधील लोक आपल्या इमारतीतून कुत्रा, मांजर यासारखे पाळीव प्राणी फेकून देत आहेत.

बीजिंग - कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 270 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 9692 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. चीनमधील लोक आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना घरातून बाहेर फेकत असल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. प्राण्यांपासून हा व्हायरस पसरत असल्याची माहिती सगळीकडे पसरल्याने लोक प्राण्यांना घरातून बाहेर काढत आहेत.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये पाळीव प्राण्यांना घराबाहेर काढल्याच्या घटना घडल्या आहेत. याचे अनेक धक्कादायक फोटो देखील समोर आले आहेत. फोटोमध्ये पाळीव प्राणी रक्ताने माखलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडले आहेत. चीनमधील लोक आपल्या इमारतीतून कुत्रा, मांजर यासारखे पाळीव प्राणी फेकून देत असल्याचं सांगितलं जात आहे.  शांघाईमध्ये 5 मांजरींना घरातून बाहेर फेकून दिले आहे. या प्राण्यांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले आढळले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोनो व्हायरसमुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे. अनेक देशांनी या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट घोषित केलेला आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसनं आतापर्यंत 270हून अधिक जणांचे मृत्यू झाले आहेत. चीनमधलं वुहान शहर या व्हायरसचं केंद्रबिंदू असून, चीनमध्ये कोरोना व्हायरसनं बाधित असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. चीनमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून, तिकडची सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.


चीन सरकारनं एका आठवड्यात कोरोना व्हायरसबाधित रुग्णांसाठी 1000 बेड्सच हॉस्पिटल निर्माण केलं आहे. येत्या एक-दोन दिवसांत या हॉस्पिटलमधून उपचार मिळण्यास सुरुवात होणार आहे. या हॉस्पिटलचं वेगानं काम सुरू असून, ते जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. 23 जानेवारीला या हॉस्पिटलच्या निर्माणाचं काम हाती घेण्यात आलं होतं. चीन ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कनं या हॉस्पिटलच्या निर्माणाचं सीसीटीव्ही फुटेज जारी केलेलं आहे. हॉस्पिटल तयार होत असलेल्या ठिकाणी लायनिंग सामग्री ठेवणाऱ्या लॉरी दिसत आहेत. तसेच अनेक जण खोदकाम करत असल्याचंही या व्हिडीओत पाहायला मिळतंय. या हॉस्पिटलचा बेस तयार झालेला दिसत असून, काम जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे.

रिपोर्टनुसार, हॉस्पिटल परिसरात अनेक इमारतींचा समावेश आहे. 25,000 चौरस मीटर परिसरात हे हॉस्पिटल पसरलेलं असून, त्याच्या निर्माणासाठी 1400 जवान कार्यरत आहेत. हॉस्पिटल आता सैन्याची वैद्यकीय सेवा सांभाळणाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं असून, सोमवारपासून कोरोना व्हायरसच्या रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे, असं सीजीटीएनने सांगितलं आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी जॉइंट लॉजिस्टिक सपोर्ट फोर्सशी संबंधित असलेले 950 वैद्य आणि पीएलएच्या सैन्य, नौदल आणि हवाई दलाच्या वैद्यकीय विद्यापीठांमधील 450 कर्मचारी हॉस्पिटलमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. हॉस्पिटलमध्ये साथीच्या आजारापासून बचाव व घटनास्थळावरच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्यासाठी 15 तज्ज्ञांची टीम तयार करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus News: चीनमधून ३२३ भारतीय परतले; दोन मराठी मुलांची मात्र परवड

जामिया विद्यापीठाजवळ पुन्हा गोळीबार, गेल्या चार दिवसातील तिसरी घटना

Budget 2020: नेपाळ, चीनला बजेटच्या प्रस्तावातून हादरा

Budget 2020: अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी सरकार कटिबद्ध- निर्मला सीतारामन

 

Web Title: China Coronavirus Pets thrown from towers after coronavirus rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.