शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध मातेला घरात राहायला न देणाऱ्या मुलावर व सुनेवर गुन्हा नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 14:23 IST

73 वर्षीय वृद्ध आईला घरात राहू न देणा-या व तिला धमकी देणा-या मुलावर व सुनेवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

मडगाव: 73 वर्षीय वृद्ध आईला घरात राहू न देणा-या व तिला धमकी देणा-या मुलावर व सुनेवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. गोव्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील कुंकळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांदाफोळ-चिंचणी येथे ही घटना घडली होती. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी क्लिोंटोनिवो पिंटो व त्याची पत्नी इल्डा अविता डिसोझा या दोघांवर गुन्हा नोंद केला आहे. भारतीय दंड संहितेच्या ३४१ , ५0४ , ५0६ तसेच कलम २४ पालक व ज्येष्ठ नागरिकाची निगराणी व काळजी कायदा २00७ अंतर्गंत संशयितांवर गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.काल बुधवारी महिला प्रदेश काँग्रेसने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित ज्येष्ठ महिला नागरिकावर होणा-या अत्याचाराला वाचा फोडली होती. संशयितांवर दखल पात्र गुन्हा नोंद करून कारवाईची मागणी प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केली होती. यावेळी मडगाव पोलीस विभागाचे उपअधीक्षक सेराफीन डायस यांनी यासंबंधी रितसर तक्रार करा, संशयितावर कारवाई करण्याची ग्वाही दिली होती.फिलोमिना पिंटो या विधवा असून, तिचा मुलगा तिला घरात वास्तव करायला देत नसल्याने ती आपल्या मुलीकडे तसेच सुनेकडे राहात होती. आपल्या नव-याच्या मालकीच्या घरात राहायला मिळावा यासाठी पिंटो यांनी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होते. न्यायालयाने तिला त्या घरात राहायला कुणी अटकाव करू नये, असा आदेशही दिला होता. मंगळवारी तिला पुन्हा क्लिटोनिवो याने घरातून बाहेर काढले होते, दरवाज्याला कडी लावली होती. तक्रारदाराला अटकाव करून धमकी दिल्याचाही संशयितांवर आरोप आहे. कुंकळ्ळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टेरन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्नेहा सावळ पुढील तपास करीत आहेत.