शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कूळप्रश्नी ‘मामलेदार की न्यायालय?’ वाद

By admin | Updated: November 28, 2014 00:22 IST

मडगाव : कूळ-मुंडकारांचे दावे मामलेदारांनी हाताळावेत की न्यायालयाने, या वादात स्वत: कूळ-मुंडकारच भरडले गेले आहेत.

मडगाव : कूळ-मुंडकारांचे दावे मामलेदारांनी हाताळावेत की न्यायालयाने, या वादात स्वत: कूळ-मुंडकारच भरडले गेले आहेत. हे दावे न्यायालयात वर्ग करावेत, अशी दुरुस्ती होऊन दोन महिने उलटले तरीही मामलेदारही नाही आणि न्यायालयही नाही, अशा अवस्थेत दक्षिण गोव्यातील एकूण ७६७ दावे रखडले आहेत. कूळ-मुंडकारांचे दावे मामलेदारांनी न हाताळता दिवाणी न्यायालयाने हाताळावेत, अशी दुरुस्ती दोन महिन्यांपूर्वी केल्याने हे सर्व दावे आता न्यायालयात वर्ग झाले आहेत. मात्र, न्यायालयांकडूनही अजून या दाव्यांची सुनावणी हाती घेतली जात नाही. रखडलेल्या दाव्यांमध्ये सासष्टीचा अग्रक्रम असून, सासष्टीत एकूण ४५६ दावे प्रलंबित आहेत. त्यापाठोपाठ केपेत १४५, सांगेत ५७, मुरगाव तालुक्यात ४५, काणकोणात ३३ तर धारबांदोड्यात ३१ दावे प्रलंबित आहेत. कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर लगेच मामलेदारांकडील दावे दिवाणी न्यायालयात वर्ग करण्यात आले आहेत; परंतु न्यायालयाच्या कामकाजापुढे हे दावेही प्रलंबित आहेत. फक्त निकाल दिलेलेच दावे नव्हे तर मामलेदारांनी कुळांच्या बाजूने निर्णय दिलेले ९३ दावेही या नव्या दुरुस्तीमुळे प्रलंबित आहेत. महसूल खात्याच्या कलम १८ (क) प्रमाणे या कुळांना जागेची मालकी जाहीर केली जाते, अशी एकूण ९३ प्रकरणे दक्षिण गोव्यात प्रलंबित आहेत. मामलेदारांनी सही करण्यापूर्वीच कायद्यात बदल झाल्यामुळेच हे दावेही न्यायालयात वर्ग करण्यात आले आहेत. सासष्टीतील एकूण ७८ दाव्यांचा त्यात समावेश आहे. ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, १८ (क) खालील दाव्यांबद्दल आता काय निर्णय घेतला जात आहे हे पाहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. काही कुळांनी १९९३ साली जमिनी खरेदी केल्या होत्या; पण त्यांना या जागेची सनद अजूनही दिलेली नाही. वास्तविक हे खटले मामलेदारांनी यापूर्वीच हातावेगळे केले आहेत. नव्या कायद्याप्रमाणे हे निर्णय ग्राह्य धरले जाणार की नाहीत हे कळणे गरजेचे असल्याचे वेळीप म्हणाले. (प्रतिनिधी)