Coronavirus: गोव्यात तीन लाख कोविड चाचण्या पूर्ण होणार; 20 हजार होम आयसोलेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 11:55 AM2020-10-20T11:55:08+5:302020-10-20T11:55:19+5:30

दहा लाखांमागे 1 लाख 94 हजार एवढे सध्या चाचण्यांचे प्रमाण आहे. देशभरात सगळीकडेच आता कोविड चाचण्या कमी केल्या जातात. ज्यांना कोविडची लक्षणे दिसतात, त्यांचीच कोविड चाचणी केली जाते.

Coronavirus: Three lakh covid tests to be completed in Goa; 20 thousand home isolation | Coronavirus: गोव्यात तीन लाख कोविड चाचण्या पूर्ण होणार; 20 हजार होम आयसोलेशन

Coronavirus: गोव्यात तीन लाख कोविड चाचण्या पूर्ण होणार; 20 हजार होम आयसोलेशन

Next

पणजी : राज्यात पुढील वीस ते बावीस दिवसांत एकूण तीन लाख कोविड चाचण्यांचा आकडा पूर्ण होणार आहे. सध्या 2 लाख 83 हजार कोविड चाचण्या झालेल्या आहेत. सध्या रोज जरी कमी चाचण्या होत असल्या तरी, पुढील वीस ते बावीस दिवसांत तीन लाख चाचण्या पूर्ण होणार आहेत व एवढय़ा चाचण्या करणारे गोवा हे छोटय़ा राज्यांमधील एक महत्त्वाचे राज्य ठरणार आहे.

दहा लाखांमागे 1 लाख 94 हजार एवढे सध्या चाचण्यांचे प्रमाण आहे. देशभरात सगळीकडेच आता कोविड चाचण्या कमी केल्या जातात. ज्यांना कोविडची लक्षणे दिसतात, त्यांचीच कोविड चाचणी केली जाते. गोव्यात रोज सरासरी बाराशे कोविड चाचण्या केल्या जातात. सोमवारी मात्र चाचण्या कमी केल्या गेल्या. फक्त 742 एवढय़ाच चाचण्या सोमवारच्या चोवीस तासांत पार पडल्या. रविवारी 1 हजार 246 चाचण्या केल्या गेल्या.

साडेपंधरा लाख लोकसंख्येच्या गोव्यात सात ते साडेसात महिन्यांत तीन लाख चाचण्या होणो हे खूप महत्त्वाचे आहे. दि. 17 सप्टेंबर्पयत राज्यात कोविड चाचण्यांचे एकूण प्रमाण 2 लाख 31 हजार 801 होते. दि. 30 सप्टेंबरला हे प्रमाण 2 लाख 54 हजार 801 र्पयत पोहचले. दि. 7 ऑक्टोबरला कोविड चाचण्यांचे एकूण प्रमाण 2 लाख 65 हजार 959 झाले. त्यावेळी दिवसाला सोळाशे ते अठराशे चाचण्या केल्या जात होत्या. दि. 12 ऑक्टोबरला एकूण कोविड चाचण्यांचे प्रमाण 2 लाख 73 हजार 404 र्पयत गेले.  त्या दिवशी चोवीस तासांत 1 हजर 442 चाचण्या झाल्या होत्या. दि. 17 ऑक्टोबरला एकूण चाचण्यांचे प्रमाण 2 लाख 80 हजारच्याही पुढे गेले. त्या दिवशी चोवीस तासांत 1 हजार 408 चाचण्या झाल्या होत्या.

20 हजार होम आयसोलेशन 
दरम्यान, होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारणाऱ्या कोविडग्रस्तांची संख्या गेल्या महिन्याभरात वाढत गेली. आतार्पयत एकूण 20 हजार 200 हून अधिक रुग्णांनी होम आयसोलेशन स्वीकारले. ज्यांना कोविडपासून त्रस होतो, तेच रुग्ण इस्पितळात जातात. होम आयसोलेशनमध्ये असणा:या रुग्णांना कोविडविषयक उपचारांच्या गोळ्य़ा, ऑक्सीमीटर वगैरे साहित्य असलेले पॅक आता घरी पोहचविले जाते. रोज सरासरी दीडशे कोविडग्रस्त होम आयसोलेशन स्वीकारत आहेत.

Web Title: Coronavirus: Three lakh covid tests to be completed in Goa; 20 thousand home isolation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.