शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Goa : गोव्यात तब्बल १३,००० कोरोनाच्या चाचण्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 16:12 IST

२२ मार्चपासून आतापर्यंत १३,००० व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यामध्ये ६६ पॉझिटिव्ह आढळले.

पणजी : पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात पर्यटक तसेच परराज्यातून येणा-या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. २२ मार्चपासून आतापर्यंत १३,००० व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यामध्ये ६६ पॉझिटिव्ह आढळले. यातील १९ रुग्ण बरे होऊन ४७ पॉझिटिव्ह बाकी राहिले आहेत. 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा असा दावा आहे की, पुढील आठ दिवसात हे पॉझिटिव्ह रुग्णही बरे होऊन घरी जातील. एका प्रश्नावर सावंत म्हणाले की, राज्य सरकारच्या विनंतीवरुन केंद्राने मर्यादित ट्रेन गोव्यात पाठविल्या परंतु देशात सर्वत्र बहुतांश ट्रेन सुरु होत आहेत. त्यामुळे विमाने किंवा ट्रेन यांना गोव्यात मज्जाव करता येणार नाही. 

दाबोळी विमानतळावर एरव्ही दररोज ९१ विमाने येतात. पुढील काळात मोठ्या प्रमाणात प्रवाशी येणार असल्याने सर्व सज्जता सरकारने ठेवली आहे. कोविड इस्पितळाची क्षमता २०० खाटांची आहे. गरज पडल्यास आणखीही पर्याय आम्ही तयार ठेवले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

गोवा हे एकमेव राज्य असे आहे की राज्यात प्रवेश करणा-या प्रत्येकाची आम्ही कोविड चाचणी केली. होम क्वारंटाइन केल्या जाणा-या ९० टक्के व्यक्ती मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात, असे त्यांनी सांगितले. मडगांवच्या कोविड इस्पितळात २०० खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्यास पर्यायी व्यवस्थाही सज्ज ठेवलेली आहे, असा दावा त्यांनी केला. 

दरम्यान, गोव्याच्या गावा-गावांमध्ये क्वारंटाइन केंद्रांना विरोध होऊ लागला आहे. ही केंद्रे आमच्या गावात नकोच, अशी भूमिका ग्रामस्थ घेत आहेत. ठिकठिकाणी ग्रामस्थ उठाव करु लागले आहेत. गेल्या आठवड्यात कांदोळी येथे मध्यरात्रीच्या सुमारास लोक जमले आणि गावात क्वारंटाइन करण्यास विरोध केला त्यानंतर शनिवारी दक्षिण गोव्यात बेताल भाटीतही असाच प्रकार घडला. राज्यात यापुढे प्रवाशांची संख्या वाढणार आहे या गर्दीमुळे गावागावांमधील हॉटेलांमध्ये क्वारंटाइन करावे लागेल त्यामुळे पुढील काही दिवसात या विरोधाची तीव्रता आणखी वाढणार आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरही पेच निर्माण झालेला आहे. 

परराज्यांमधून तसेच विदेशातून गोव्यात येणा-या प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या रेसिडेन्सी तसेच काही खाजगी हॉटेल्स व अन्य आस्थापने सरकारने घेतलेली आहेत. मात्र प्रवाशांना तेथे पाठवल्यानंतर स्थानिक लोक विरोध करतात. शनिवारी बेतालभाटी येथे एका हॉटेलमध्ये क्वारंटाइनसाठी नेलेल्या आठजणांना स्थानिकांनी अडवून मज्जाव केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा