शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: प्रश्नपत्रिकेतील आक्षेपार्ह प्रश्नांबाबत कारवाई हवी, भाजपाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 20:43 IST

Coronavirus News: काही गोमंतकीय विदेशात जाऊन नोकरी-धंदा करतात ही जागतिक प्रक्रिया आहे.

पणजी : दहावीच्या परीक्षेच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत जे दोन प्रश्न समाविष्ट केले गेले आहेत, ते आक्षेपार्हच आहेत. त्याविषयी शालांत मंडळाने चौकशी सुरू करावी व जे कुणी यास जबाबदार आहेत, त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश भाजपाने केली आहे. सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी प्रवक्ते प्रेमानंद म्हांब्रे यांच्यासोबत सोमवारी येथे पत्रकार परिषद घेतली. काही गोमंतकीय विदेशात जाऊन नोकरी-धंदा करतात ही जागतिक प्रक्रिया आहे.जगात सगळीकडेच असे चालते. केवळ गोव्याबाबतच असे घडतेय असे नव्हे. मात्र तो विषय वेगळा आहे. इंग्रजीच्या व्याकरणाविषयी प्रश्न तयार करताना शिक्षकांनी आक्षेपार्ह असा प्रश्न विचारला. पोर्तुगीज नागरिकत्व बरे असा संदेश शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिला. गोव्यात रोजगारासाठी फार कमी संधी आहे व त्यासाठी आपण पोर्तुगीज पासपोर्टसाठी अर्ज केला आहे, असा संवाद प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. गोव्यात भ्रष्टाचार गोमंतकीयांना पिडतोय, अशा अर्थाचाही संवाद आहे. याविषयी भाजपाकडून प्रश्नपत्रिका तयार करणारा शिक्षक व अन्य संबंधित घटक यांचा निषेध केला जात असल्याचे सावईकर यांनी सांगितले.शिक्षण क्षेत्रात अराष्ट्रीय वृत्ती नको.राष्ट्रविरोधी मानसिकता घेऊन काही शिक्षक वावरतात, असा अर्थ प्रश्नपत्रिकेतील संवादातून होतो. अशा प्रकारची मानसिकता शिक्षण क्षेत्रात तरी नको, असे म्हांब्रे म्हणाले. प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी एक प्रक्रिया असते. शालांत मंडळ प्रश्नपत्रिकेसाठी अप्रत्यक्षरीत्या जबाबदार ठरते. जे थेट जबाबदार ठरतात, त्यांची चौकशी केली जावी व कारवाई व्हावी असे म्हांब्रे म्हणाले. आम्ही मुख्यमंत्र्यांसमोरही हा विषय मांडलेला आहे, असे सावईकर म्हणाले. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ट्विट करून प्रश्नपत्रिकेतील वादग्रस्त प्रश्नांचे समर्थन केले आहे. कामत यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आम्ही त्यांचाही निषेध करतो, असे सावईकर यांनी सांगितले व काँग्रेस पक्षाने याविषयी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या