शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

किनारपट्टी नियमन योजनेला गोवा सरकारचाच खो!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 8:44 PM

एक काळ असा होता, समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक्स (खानपानगृहे) ही राज्याची शान होती. तेथे आपुलकी, निवांतपणा व उत्कृष्ट स्थानिक खाणजेवण उपलब्ध होत असे.

- राजू नायकएक काळ असा होता, समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक्स (खानपानगृहे) ही राज्याची शान होती. तेथे आपुलकी, निवांतपणा व उत्कृष्ट स्थानिक खाणजेवण उपलब्ध होत असे. परंतु पुढे ती राजकीय आशीर्वादाने ताब्यात घेतली जाऊ लागली. आज त्यांनी नितांत सुंदर किनाऱ्यांना गालबोट लावले आहे. त्यामुळे जोपर्यंत किनारपट्टी विभाग व्यवस्थापन योजना मंजूर होत नाही, तोपर्यंत राज्यात शॅक्स उभारू देणार नाही, या राष्टÑीय हरित लवादाच्या आदेशामुळे येथील पर्यावरणवाद्यांना आनंद झाला तर नवल नाही. याचा अर्थ असाही आहे की यापूर्वी- पर्यटन हंगामात किनारे स्वच्छ असतील, सुरक्षित असतील. किनाºयांवर शॅक्स काही दिसणार नाहीत.

पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी नोव्हेंबरपर्यंत तरी गोव्याची किनारपट्टी योजना तयार होणार नसल्याचे जाहीर केले आहे. वास्तविक योजना सादर करण्याची हुकलेली ही तिसरी वेळ आहे. मे २०१८ मध्ये राज्य सरकारने पहिली तारीख टाळली. ३१ आॅगस्टलाही ती सादर करण्यात सरकारला अपयश आले आणि तिसºयांदा मुदतवाढ देण्याची विनंती करून राज्य हरित लवादासमोर गेले तेव्हा न्यायालयाने हे नवे निर्बंध जाहीर केले. आता १५ नोव्हेंबरपर्यंत योजना तयार करण्याची मुदत आहे.

वास्तविक यावर्षी शॅक्स जरी किनाºयांवर दिसणार नसले तरी शॅक्सबाबत एकूणच जनतेला विचार करायला मिळालेली ही वेळ आहे व ती संधी लोकांनी गमावता कामा नये. समाजकार्यकर्ते, पर्यावरणवादी यांनी आता ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे.निसर्गाचा ढळलेला तोल, ठिकठिकाणी आलेले पूर, अतिवृष्टी, कोसळणाºया दरडी यामुळे गोव्यालाही पर्यावरणासंबंधी काही निर्णय घेण्यास ही संधी आहे असे मानता येईल.

गोव्याचे किनारे हल्लीहल्लीपर्यंत सुंदर होतेच, स्वच्छ व पर्यावरणीय दृष्टीने सुदृढही होते. परंतु पर्यटनामुळे हितसंबंधी गटांचा या किनाºयांना विळखा बसला. किनाºयांवर बांधकामे आली. संपूर्ण किनारपट्टी सध्या बीभत्स बांधकामांनी व्यापली आहे. हॉटेलांनी तेथे पक्की बांधकामे केलीच, शिवाय शॅक्स- जे झावळ्या, बांबू व तात्पुरत्या साहित्यातून बांधले जात- सध्या पक्की बांधकामे करून किनाºयांवर कायमचे उभे झाले आहेत. गेली काही वर्षे समुद्रपातळी वाढीचा परिणाम गोव्यालाही बाधतो आहे. शॅक्सनी किनारे अडवलेले आहेतच, शिवाय त्यांच्या खाटाही लोकांचे मार्ग अडवितात. बºयाचदा पाणी व लाटा शॅक्स व्यापून जातात.

किनाºयावरची वाळूची बेटे व वनस्पती शॅक्स व इतर बांधकामांसाठी तोडली आहेत. ही बेटे व वनस्पती किनारपट्टीच्या संरक्षणाच्या ढाली होत्या. त्सुनामी आला जेव्हा जेथे खारपुटी जंगले व ही वाळूची बेटे होती, तेथे फारसा परिणाम झाला नाही. दुर्दैवाने गोव्याच्या संपूर्ण किनाºयावर या वाळूच्या टेकड्या व त्यांना घट्ट धरून ठेवणाºया वनस्पती छाटून टाकण्यात आल्या. शिवाय शॅक्स व इतर पर्यटन व्यवहारांमुळे कचरा साचला. त्यांचे सांडपाणी समुद्रात जाऊ लागले. बºयाच ठिकाणी जादा पाणी किनाºयावरून आत-बाहेर करण्याची व्यवस्था होती, ती नष्ट झाली. परिणामी किनारपट्टी एका बाजूला संवेदनशील बनलीय, शिवाय तेथे येणाºया दुर्मिळ आॅलिव्ह रिडली कासवांची संख्या घटली. मोरजी व मांद्रे येथे तर वन खात्याने संरक्षित कासव पैदास केंद्रे चालविली आहेत. परंतु तेथेही क्वचितच कासव दिसतात. सध्या गालजीबाग व आगोंदा या किनाºयांवर ही कासवे दिसेनाशीच झाली आहेत. स्थानिकांच्या मते, शॅक्स चालविणारे लोक कासवांना हाकलून लावतात; कारण सीआरझेड अधिसूचना २०११ मध्ये त्यांना संरक्षित मानले आहे आणि त्यामुळे किनाºयांवर विकासासाठी निर्बंध येतात. त्यांचाच शॅक्सवाल्यांना अडथळा वाटतो. लक्षात घेतले पाहिजे की पर्यटनाची वाढ होण्यापूर्वी गोव्यात संपूर्ण किनाºयांवर कासवांची नैसर्गिक पैदास केंद्रे होती.

कासव पैदास केंद्रे हटवावीत, सीआरझेड कायदा सौम्य बनवावा, सरकारने येथील नियंत्रणाकडे आडनजर करावी यासाठी तर सरकारवर स्थानिकांचा वाढता दबाव आहे. बºयाच स्थानिक आमदार, मंत्री व सरपंचांचा सरकारवर त्याचसाठी दबाव असतो. सरकारही फारसे गंभीर नाही. तेच खरे कारण आपली किनारपट्टी योजना तहकूब होण्यात झाले आहे. ज्या किनारपट्टी योजनेमुळे लोकांचे जीवन संरक्षित बनणार आहे, त्यांनाच वाढत्या पर्यटन हव्यासाने धोका निर्माण केला आहे. हरित लवादाने हस्तक्षेप करण्याचे तेच खरे कारण असून राज्य सरकारवर पर्यावरणवाद्यांनी दबाव आणला तरच ही योजना वेळेत तयार होऊ शकते!