शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

बेरोजगार युवकांना नोक-या हव्यात, मुख्यमंत्री तोडगा काढतील : विश्वजित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 8:40 PM

राज्यातील शिक्षित बेरोजगार युवकांना नोक-यांची गरज आहे.

पणजी : राज्यातील शिक्षित बेरोजगार युवकांना नोक-यांची गरज आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी याविषयी माझी चर्चा झाली आहे व ते 31 डिसेंबरनंतर तोडगा काढतील, असा विश्वास आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.आपल्या आरोग्य खात्यासह अन्य खात्यांनाही ज्यादा कर्मचारी वर्गाची खूप गरज आहे. त्यासाठी नोकर भरती व्हायला हवी. आपण मुख्यमंत्री सावंत यांच्याशी याविषयी चर्चा केली आहे. बेरोजगार युवक नोक-या मागतात. आम्ही 31 डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करायला हरकत नाही. डिसेंबरनंतर किंवा तत्पूर्वी मुख्यमंत्री तोडगा काढतील, असे मंत्री राणे म्हणाले.सेझ जमिनींचा लिलाव सेझ कंपन्यांविरुद्ध जो एफआयआर पूर्वी नोंद करण्यात आला होता, तो एफआयआर रद्द करावा, कारण आता जमिनी परत मिळाल्या आहेत. जमिनी मिळाल्यानंतर एफआयआर रद्द करावा, असा निर्णय मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळाने यापूर्वीच घेतला होता. आता त्याविषयी कायदा सल्ला घेण्यासाठी फाईल ऍडव्होकेट जनरलांकडे पाठवली जाईल, असे उद्योगमंत्री या नात्याने बोलताना राणे यांनी सांगितले. सेझ जमिनींपैकी पाच लाख चौरस मीटर जमिनीचा लिलाव झाला तरच आयडीसीला कर्ज फेडणे शक्य होईल. अन्यथा पुढील मार्च महिन्यापासून दर महिन्याला साडेतीन कोटींचा हप्ता बँकेत जमा करण्याची वेळ आयडीसीवर येईल. लिलावाच्या विषयावरही ऍडव्हकेट जनरलांकडून कायदेशीर सल्ला मागण्यात आला आहे, असे राणे यांनी सांगितले.म्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्यांवर विश्वास दरम्यान, म्हादई पाणीप्रश्नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे निश्चितच तोडगा काढतील. मुख्यमंत्री आणि केंद्र सरकार मिळून गोव्याला न्याय देतील. आमचा मुख्यमंत्र्यांवर त्याबाबत पूर्ण विश्वास आहे, असे राणे म्हणाले. म्हादई नदी ही सत्तरी तालुक्याला जास्त जवळची आहे. ज्या काही व्यक्तींनी कधी म्हादई नदी पाहिलेलीच नाही, त्या व्यक्ती सत्तरीत येतात व म्हादई नदीवरून आंदोलन करण्याचा प्रयत्न करतात. सत्तरीच्या लोकांनी त्या आंदोलकांना मुळीच प्रतिसाद दिलेला नाही. म्हादईच्या पाण्याचा विषय काही जण राजकारण करण्यासाठी वापरत आहेत. अशा राजकारण्यांना गोमंतकीयांचा पाठिंबा मिळणार नाही, असेही राणे यांनी नमूद केले.