शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मांडवीतील कॅसिनो बंद करा

By admin | Updated: June 25, 2014 17:29 IST

पणजी : कॅसिनो जहाजांमधील सांडपाणी मांडवी नदीत सोडण्यात येत असल्याने नदीच्या पाण्यातील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. नदीतील प्रदूषण मानवी जीवनाला घातक असून,

पणजी : कॅसिनो जहाजांमधील सांडपाणी मांडवी नदीत सोडण्यात येत असल्याने नदीच्या पाण्यातील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. नदीतील प्रदूषण मानवी जीवनाला घातक असून, सरकारने तरंगते कॅसिनो त्वरित बंद करावेत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. गोवा प्रदूषण मंडळाने भाजपा सरकार सत्तेवर येण्यापूर्वी मांडवीतील पाण्याचा नमूना तपासून मांडवीत ‘कॉलिफॉर्म बॅक्टेरिया’चे प्रमाण मर्यादेपेक्षा ३३८ टक्के वाढले असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता प्रदूषण मंडळ हे प्रदूषण कॅसिनोंच्या मलनिस्सारणामुळे नसल्याचे सांगत आहे. या प्रदूषणामुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे पाण्यातील जैविक संपदेवर परिणाम होत असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. उल्हास परब यांनी केला आहे. मांडवी नदीच्या किनारी राहाणाऱ्या लोकांच्या आरोग्यावरही या प्रदूषणाचा परिणाम होऊ शकतो. तसेच मांडवीतील मासे खाल्ल्यासही प्रदूषणाचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारने मांडवीतील कॅसिनो बंद करण्याबरोबरच पर्यावरण कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल करावे, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. दरम्यान, भाजपा सरकारने चोवीस तास पाणी व वीज देण्याचे आश्वासन दिले होते; पण आम आदमीला अजूनही पाणी आणि विजेसाठी त्रास सोसावे लागत आहेत. वीजमंत्री मिलिंद नाईक कुटुंबासमवेत स्वित्झर्लंड, मंत्री दयानंद मांद्रेकर अमेरिका व पाणीपुरवठ्याचा आधुनिक प्रकल्प गोव्यात उभारण्यासाठी व त्याचा अभ्यास करण्यासाठी मंत्री सुदिन ढवळीकर सिंगापूरचा दौरा करून आले आहेत. मंत्री अभ्यास दौऱ्यासाठी नव्हे केवळ सहलीसाठी परदेशात जातात, असा आरोप काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी केला. रेल्वेचे भाडे महाग करून केंद्र सरकारने सर्वसामान्य लोकांवर संकट आणले आहे. सरकारचे कोणतेही धोरण सामान्य माणसाच्या उत्कर्षाचे नाही. आवश्यकता नसताना मांडवी उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. जुवारी पुलावरून दिवसाला लाखो नागरिक ये-जा करत असतात. खचत चाललेल्या जुवारीबाबत सरकार कोणताही निर्णय घेत नाही. राज्याबरोबरच आता केंद्रातही परिवर्तनाचे वारे वाहू लागले असल्याचे कुतिन्हो म्हणाल्या. (प्रतिनिधी)