गोव्यात मुख्य सर्व्हेक्षकाला मारहण, पोलिसांनी तयार केलं संशयिताचं स्केच; लुकआउट नोटीस जारी

By सूरज.नाईकपवार | Published: March 21, 2024 03:58 PM2024-03-21T15:58:08+5:302024-03-21T15:58:22+5:30

पोलिसांना त्या मारेकऱ्याची दुचाकी सापडली होती. ती वार्का येथील एका महिलेच्या नावावर नोंदणीकृत आहेत. पोलिसांनी तिच्या घरी जाउन चौकशी केली असता, ती दुचाकी विकली गेली होती. मात्र त्याच्या नावावर ती ट्रान्सफर केली गेली नव्हती अशी माहिती मिळाली होती.

Chief Surveyor beaten in Goa, police prepare sketch of suspect; Lookout notice issued | गोव्यात मुख्य सर्व्हेक्षकाला मारहण, पोलिसांनी तयार केलं संशयिताचं स्केच; लुकआउट नोटीस जारी

गोव्यात मुख्य सर्व्हेक्षकाला मारहण, पोलिसांनी तयार केलं संशयिताचं स्केच; लुकआउट नोटीस जारी

मडगाव : गोव्यातील मडगाव येथील भू सर्व्हेक्षण खात्यातील मुख्य सर्व्हेक्षकाला मारहण प्रकरणातील त्या अज्ञात संशयिताचे स्केच पोलिसांनी तयार केला असून त्याच्याविरोधात लुकआउट नोटीसही जारी केली आहे.सोमवार दि. १८ मार्च रोजी दुपारी येथील माथानी साल्ढाणा संकुलात असलेल्या भू सर्व्हेक्षण खात्यातील मुख्य सर्व्हेक्षक प्रसाद सावंत देसाई यांना कार्यालयात आलेल्या एका अनोळखी इसमाने मारहाण केली होती.हॅल्मेटने मारहाण करुन नंतर संंशयिताने घटनास्थळाहून पळ काढला होता, या मारहाणीत देसाई हे जखमी झाले होते.

पोलिसांना त्या मारेकऱ्याची दुचाकी सापडली होती. ती वार्का येथील एका महिलेच्या नावावर नोंदणीकृत आहेत. पोलिसांनी तिच्या घरी जाउन चौकशी केली असता, ती दुचाकी विकली गेली होती. मात्र त्याच्या नावावर ती ट्रान्सफर केली गेली नव्हती अशी माहिती मिळाली होती.

संशयित ३५ ते ४० वयोगटातील आहेत. तो शरिरयष्टीने धडधाकट असून, त्याने मिशी व दाढीही ठेवली आहे. भादंसंच्या ३२३,५०४ ,३५३ व ५०६ (२) कलमाखाली अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अतिकेश खेडेकर पुढील तपास करीत आहेत.
 
Web Title: Chief Surveyor beaten in Goa, police prepare sketch of suspect; Lookout notice issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.