लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मळा तलावात मोठ्या प्रमाणावर मासळी मृतावस्थेत आढळून आल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत खंडपीठाने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला मांडवी नदीतीलही पाण्याच्या गुणवत्तेचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायालयाने विशेषतः ज्या ठिकाणी कॅसिनो जहाजे उभी असतात त्या भागातील पाण्याची गुणवत्ता तपासण्यावर भर दिला आहे. या अभ्यासात पाण्याचे गुणात्मक तसेच परिमाणात्मक विश्लेषण करण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित अहवाल जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी मळा तलाव येथे मोठ्या प्रमाणावर मासे मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक रहिवाशांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
दरम्यान, पणजी महानगरपालिकाचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी तलावात सांडपाणी सोडले जात असल्याचा संशय व्यक्त केला होता. तसेच अशा प्रकाराला जबाबदा असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता. या प्रकरणामुळे आता मांडवी नदीतील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित यंत्रणांवर जबाबदारी अधिकच वाढली आहे.
तलावाच्या परिसरातील घरांची पाहणी करा : उच्च न्यायालय
मळा तलाव प्रदूषणप्रश्नी त्या परिसरातील घरांची संयुक्त पाहणी करुन त्याचा अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने पणजी महानगरपालिका, जलस्रोत खाते व गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. संयुक्त पाहणी ही तीन दिवसांत पूर्ण करावी, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. त्यानुसार या याचिकेवरील सुनावणी बुधवार, १३ मे पर्यंत तहकूब केली आहे.
Web Summary : Following mass fish deaths in Mala Lake, the High Court ordered a water quality assessment of the Mandovi River, especially near casinos. A report, including qualitative and quantitative analysis, is due in early June. The court also ordered a joint inspection of houses near Mala Lake to investigate pollution sources.
Web Summary : माला झील में बड़े पैमाने पर मछली मरने के बाद, उच्च न्यायालय ने मांडवी नदी, खासकर कैसीनो के पास, के पानी की गुणवत्ता का आकलन करने का आदेश दिया। गुणात्मक और मात्रात्मक विश्लेषण सहित एक रिपोर्ट जून की शुरुआत में देय है। न्यायालय ने प्रदूषण स्रोतों की जांच के लिए माला झील के पास के घरों का संयुक्त निरीक्षण करने का भी आदेश दिया।