शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय कोर्टाने एसीबीला सुनावले

By admin | Updated: October 4, 2014 01:21 IST

पणजी : सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी सादर केलेल्या एका तक्रारीच्या अनुषंगाने सीबीआय कोर्टाने गोवा सरकारच्या दक्षता

पणजी : सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी सादर केलेल्या एका तक्रारीच्या अनुषंगाने सीबीआय कोर्टाने गोवा सरकारच्या दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला (एसीबी) कडक शब्दांत सुनावले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विरुद्ध रॉड्रिग्ज यांनी एका नोकर भरती प्रकरणी तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांविरुद्ध एफआयआर नोंद केला जावा म्हणून रॉड्रिग्ज हे न्यायालयात गेले होते. न्यायालयाने एफआयआर नोंद करण्याचा आदेश दिला नाही; पण एसीबीला कडक शब्दांत योग्य तो सल्ला दिला आहे. मुख्यमंत्र्यांविरुद्ध असलेल्या तक्रारीबाबत एसीबीने मुख्यमंत्र्यांकडूनच आदेश घेतले. असा प्रकार म्हणजे आरोपीकडूनच आदेश घेण्यासारखे आहे, असे सीबीआय कोर्टाने म्हटले आहे. मंत्र्यांविरुद्ध असलेल्या तक्रारीवर त्याच मंत्र्यांकडून आदेश घेणे, अशा प्रकारची प्रक्रिया करू नका, असे सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी एसीबीच्या पोलीस अधीक्षकांना सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्याचा संदर्भही सीबीआय कोर्टाने घेतला आहे. दरम्यान, नोकर भरतीवेळी फसवणूक झाल्याचा व शासकीय तिजोरीला नुकसान झाल्याचे अ‍ॅड. रॉड्रिग्ज यांचे म्हणणे होते. तथापि, सीबीआय न्यायालयाने एफआयआर नोंद करण्याचा आदेश दिलेला नसल्याने रॉड्रिग्ज यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे दाद मागण्याचे ठरविले आहे. (खास प्रतिनिधी)