शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

भाजप ३४, मगो ९ जागा लढवणार

By admin | Updated: February 28, 2015 02:03 IST

पणजी : येत्या १८ मार्च रोजी होत असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी अधिकृतरीत्या युतीची घोषणा केली.

पणजी : येत्या १८ मार्च रोजी होत असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी अधिकृतरीत्या युतीची घोषणा केली. जिल्हा पंचायतीच्या ५० पैकी ३४ जागा भाजप, तर ९ जागा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष लढवणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केली. मंत्री मिकी पाशेको यांच्या गोवा विकास पक्षाला पाच, तर अपक्ष मंत्री आवेर्तान फुर्तादो व आमदार बेंजामिन सिल्वा यांना सासष्टीतील प्रत्येकी एक जागा भाजपकडून सोडण्यात आली आहे. भाजपकडून मगो पक्षाला जिल्हा पंचायतीच्या नऊ जागा सोडल्या जातील, असे वृत्त दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’नेच दिले होते. उसगाव, बेतकी-खांडोळा, कुर्टी-खांडेपार, वेलिंग-प्रियोळ, कवळे, बार्से, सांकवाळ, सांताक्रुझ आणि चिंबल हे जिल्हा पंचायत मतदारसंघ मगो पक्ष लढवणार आहे. उत्तर गोव्यातील सांताक्रुझ व चिंबल हे दोनच जिल्हा पंचायत मतदारसंघ मगो पक्षासाठी देण्यात आले आहेत. राज्यातील सत्ताधारी आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष असलेला भाजप उत्तर गोव्यातील २३, तर दक्षिण गोव्यातील ११ जागा लढवणार आहे. हरमल, मोरजी, धारगळ, तोरसे, शिवोली, कोलवाळ, हळदोणे, शिरसई, अंजुणे, कळंगुट, सुकूर, रेईश मागूश, पेन्ह द फ्रान्स, ताळगाव, खोर्ली, सेंट लॉरेन्स (आगशी), लाटंबार्से, सर्वण-कारापूर, मये, पाळी, होंडा, केरी, नगरगाव, बोरी, शिरोडा, दवर्ली, गिरदोली, सावर्डे, धारबांदोडा, रिवण, शेल्डे, खोला, पैंगीण व कुठ्ठाळी हे मतदारसंघ भाजप लढवणार आहे. मंत्री पाशेको यांच्या गोवा विकास पक्षाला राय, नुवे, कोलवा, बाणावली व कुडतरी या पाच जागा देण्यात आल्या आहेत. वेळ्ळी आणि नावेली हे दोन जिल्हा पंचायत मतदारसंघ अपक्ष आमदार बेंजामिन सिल्वा व मंत्री फुर्तादो यांच्या उमेदवारांसाठी सोडण्यात आले आहेत. मगोचे मंत्री सुदिन ढवळीकर, दीपक ढवळीकर, ‘गोविप’चे पाशेको, अपक्ष मंत्री फुर्तादो, सिल्वा, पंचायतमंत्री दयानंद मांद्रेकर, आमदार विष्णू वाघ, खासदार नरेंद्र सावईकर हेही पत्रकार परिषदेस उपस्थित होते. स्थैर्यासाठी २०१७ सालीही युती भाजप, मगो पक्ष, गोविप, अपक्ष आमदार अशी युती आम्ही २०१२च्या विधानसभा निवडणुकीवेळी केली होती. ही युती आता जिल्हा पंचायत निवडणुकीवेळीही आम्ही कायम ठेवली आहे आणि २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळीही ती कायम असेल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. गोव्याला राजकीय स्थैर्य आहे. जिल्हा पंचायतींना जास्त अधिकार व जास्त निधीही मिळेल. (खास प्रतिनिधी)