शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

मुरगाव नगराध्यक्षपदी भावना भोसले

By admin | Updated: May 31, 2014 01:35 IST

वास्को : मुरगावच्या नगराध्यक्षपदी भावना भोसले यांची निवड झाली आहे, तर उपनगराध्यक्षपदी जेरी फर्नांडिस हे बिनविरोध निवडले आहेत.

 वास्को : मुरगावच्या नगराध्यक्षपदी भावना भोसले यांची निवड झाली आहे, तर उपनगराध्यक्षपदी जेरी फर्नांडिस हे बिनविरोध निवडले आहेत. नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीत भावना भोसले यांनी प्रतिस्पर्धी सुनीता लान्डिस यांचा १३ विरुद्ध ७ मतांनी पराभव केला. दि. २६ मे रोजी नगराध्यक्षा तारा केरकर व उपनगराध्यक्ष सैफुल्ला बशीर खान यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना या पदांवरून पायउतार व्हावे लागल्यानंतर नव्याने ही पदे भरण्यासाठी नगरविकास संचालनालयातर्फे पालिका मंडळाची शुक्रवारी सकाळी खास बैठक बोलविली होती. या बैठकीला वीसही नगरसेवक हजर होते. अतिरिक्त संचालक-२ येनकॉन ए. एल. परेरा यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. मुख्याधिकारी यशवंत तावडे आणि साहाय्यक कर अधिकारी येळेकर यांनी त्यांना सहकार्य केले. आरंभी उपनगराध्यक्षपदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने जेरी फर्नांडिस यांची या पदावर बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकार्‍यांनी अधिकृतपणे जाहीर केले. त्यानंतर नगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी भावना भोसले व सुनीता लान्डिस यांचे अर्ज सादर झाले होते. निवडणूक अधिकार्‍यांनी दोन्ही उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी दिला. मात्र, या वेळेत कुणीही अर्ज मागे घेतला नाही. त्यानंतर झालेल्या मतदानात भावना भोसले यांना १३ तर सुनीता लान्डिस यांना ७ मते पडल्याने भोसले या नगराध्यक्षपदी निवडून आल्याचे निवडणूक अधिकार्‍यांनी जाहीर केले. हा निकाल विरोधी गटासाठी धक्कादायक ठरला. कालपर्यंत विरोधी गटाच्या बाजूने ९ नगरसेवकांचे बळ होते. या गटाला शहरातील एका उद्योगपतीचे समर्थन होते. त्यांच्या मदतीने सत्ताधारी गटातील एक-दोन नगरसेवक आपल्या गटात ओढून सत्ताधारी गटाला धक्का देण्याचा विरोधकांचा विचार होता. मात्र, नगरसेवक तथा वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा व वीजमंत्री मिलिंद नाईक यांनी या उद्योगपतीला शह देण्यासाठी विरोधी गटातील दोन नगरसेवकांनाच आपल्या बाजूने वळवल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत १३ विरुद्ध ७ मतांनी बाजी मारली. तारा केरकर या नगराध्यक्षपदी निवडल्या होत्या, त्या वेळी दोन्ही गटांत प्रत्येकी १० नगरसेवक होते. त्यामुळे लॉटरीद्वारे तारा केरकर यांची निवड झाली होती; परंतु चारच दिवसांनी नगराध्यक्ष केरकर व उपनगराध्यक्ष सैफुल्ला खान यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव ११ विरुद्ध ९ मतांनी मंजूर झाला होता. मात्र, शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या बाजूने १३ मते पडल्याने हा गट सध्या भक्कम झाल्याचे तसेच गेली साडेतीन वर्षे या पालिकेवर असलेले उद्योगपतीचे वर्चस्व कमी झाल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)