कलाकार विद्यार्थ्यांना येणार ‘अच्छे दिन’!

By Admin | Updated: June 14, 2015 01:54 IST2015-06-14T01:54:20+5:302015-06-14T01:54:20+5:30

क्रीडापटू विद्यार्थ्यांना मिळणारे गुण आता गायन, नृत्य, थिएटर आर्ट इत्यादी कलांत प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहेत. माध्यमिक आणि उच्च

Artists will come to the students 'good days'! | कलाकार विद्यार्थ्यांना येणार ‘अच्छे दिन’!

कलाकार विद्यार्थ्यांना येणार ‘अच्छे दिन’!

क्रीडापटू विद्यार्थ्यांना मिळणारे गुण आता गायन, नृत्य, थिएटर आर्ट इत्यादी कलांत प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात क्रीडा धोरणानंतर आता सांस्कृतिक धोरणही तयार होत आहे.
शिक्षण क्षेत्रासाठी राज्याचे सांस्कृतिक धोरण आकार घेत असून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांत शिकणाऱ्या कलाकार विद्यार्थ्यांसाठी ही चांगली खबर आहे. नृत्य, नाट्य, गायन, वादन आणि इतर कलांचा या धोरणात समावेश असून राज्याच्या कला आणि संस्कृती खात्याकडून या धोरणाचा मसुदा बनविण्याचे काम सुरू आहे. मसुदा तयार झाल्यानंतर तो मान्यतेसाठी सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
याविषयी माहिती देताना कला आणि संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले की, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी सांस्कृतिक धोरण बनविण्याचे काम सुरू आहे. क्रीडापटू विद्यार्थ्यांप्रमाणेच कलाकार विद्यार्थ्यांसाठीही फायदा मिळवून देणारे धोरण व्हावे, यासाठी लोकांची पत्रे व इतर माध्यमांतून सूचना आल्या. त्यामुळेच हा विचार घेऊन धोरणाचा मसुदा बनविण्याचे काम सुरू करण्यात आले. तज्ज्ञांची मदत घेऊन या धोरणाचा मसुदा बनविणे सुरू आहे. या धोरणाचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.
शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांना याविषयी विचारले असता, शैक्षणिक क्षेत्रात क्रीडा धोरणानंतर आता सांस्कृतिक धोरणही बनत आहे, ही चांगली गोष्ट आहे. या बाबतीत शिक्षण खात्याची भूमिका अत्यंत सकारात्मक राहील, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Artists will come to the students 'good days'!