शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील लोकोत्सवात नव्या रूपात कलाविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 21:04 IST

गोव्यातील जुन्या परंपरेला नवा साज दिलेली कला सध्या लोकोत्सवात पाहायला मिळत आहे. लोकोत्सवामधील वेगवेगळ््या दोन महिला हस्तकारागिरांचे स्टॉल्स सध्या आकर्षण बनत आहे. एका दालनावर पोफळीच्या झाडाच्या  'पोवली' पासून आकर्षक असे लॅम्प्स तयार करून ते मांडण्यात आले आहे.

पणजी - गोव्यातील जुन्या परंपरेला नवा साज दिलेली कला सध्या लोकोत्सवात पाहायला मिळत आहे. लोकोत्सवामधील वेगवेगळ््या दोन महिला हस्तकारागिरांचे स्टॉल्स सध्या आकर्षण बनत आहे. एका दालनावर पोफळीच्या झाडाच्या  'पोवली' पासून आकर्षक असे लॅम्प्स तयार करून ते मांडण्यात आले आहे. तर दुस-या दालनावर 'नवें' म्हणजेच भाताच्या कणसापासून तयार केलेले 'झेले' तोरण आकर्षण ठरत आहे.

संबंध लोकोत्सवात ही गोमंतकीय कलाकारांची दोन दालने वेगळे काही तरी घेऊन आली आहेत. पणजी येथील एका महिला कलाकाराने (आपले नाव न देण्याच्या अटीवर) सांगितले की, हे  पोफळीच्या पानाच्या पोवल्यांपासून बनविलेले लॅम्प मी सुरूवातीला स्वत:च्या घरासाठी बनविले होते. व नंतर जेव्हा आपल्या दुकानावर ते लावले होते तेव्हा लोकांना ते आवडायला लागले यामुळे  गेल्या दोन वर्षापासून हे हस्तकारागिरी असलेले लॅम्प तयार करत आहे व पहिल्यांदाच गोमंतकीय ग्राहकांसाठी ते उपलब्ध केले आहे. यासाठी कर्नाटकातून पोवल्या आणल्या जातात. त्रिकोणी आकाराचे हे लॅम्प २५० तर मोठ्या आकाराचे ७५० रूपये अशा दरात उपलब्ध  आहेत. या पोवल्यांवर सुंदर नक्षिकाम करून ते तयार केले आहेत. तसेच त्यांच्यावर रंग करण्यात आला आहे. १ लॅम्प तयार करण्यासाठी आठवडाभर प्रक्रिया करावी लागत असल्याचे त्या महिला कलाकाराने सांगितले.  

दुस-या एका दालनावर शिरोडा येथील मैथीली शिरोडकर (२३) या युवा हस्तकारागिर कलाकाराने गोव्यातील लुप्त होत चाललेल्या भातांच्या कणसांचे तोरण व झेले (पॅडी आर्ट) यांना नविन साज देऊन ते लोकोत्सवाच्या दालनात मांडले आहेत. गांवामध्ये जेव्हा नवीन कणस यायचे तेव्हा नवे म्हणून ते झेले व तोरण तयार करून घरांमध्ये लावले जायचे. मात्र हळुहळु ही कला व परंपरा लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे मैथिली हीने सांगितले.

 शिवजयंतीसाठी फार्मागुडी येथे असे भाताच्या कणसांचे तोरण लावलेले आपले बाबा प्रदिप शिरोडकर यांनी बघितले व नंतर त्या कलाकाराचा पत्ता शोधून मडकई येथे जाऊन त्यांच्याकडून ती कला आत्मसात करून घेतली. व बाबांकडून मी ही कला आत्मसात केली असे मैथीली हीने सांगितले. 

इफ्फीच्या वेळी ईएसजी संकुलातील मॅकनीझ पॅलेसकडे हे तोरण लावले होते तेव्हा लोकांकडून प्रशंसा झाली व ती कला पूढे नेण्याचे ठरविले असे तीने सांगितले. शाळेत शिकत असतानाच मला हस्तकारागिरीची आवड होती. त्यात बाबांचे सतत प्रोत्साहन मिळाले. सध्या एमएचे शिक्षण घेता घेता ही कला सुरू ठेवली आहे. 

यासाठी सावंतवाडीतून भाताची कणसे आणली जातात. व ती स्वच्छ करून टप्प्या टप्प्यांवर प्रक्रिया सुरू होते. एक झेलो करण्यासाठी अर्धाताप पुरे. तर झेलो करण्यासाठी ३ तास लागतात. झेलो ३५० ते ८०० रूपया पर्यंत तर तोरण ५०० ते १५०० रूपयांपर्यंत उपलब्ध आहे. 

 ही कला नवीन पीढीपर्यंत पोहोचवण्याकरीता शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन कार्यशाळा घेते तसेच घरात या तोरण व झेल्यांसाठी आॅर्डर्स  येतात असे मैथीली हीने सांगितले. गोव्यातील ही कला लुप्त होऊ न देता ती पुढे न्यायची आहे असे त्या सांगतात. 

टॅग्स :goaगोवा