लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: प्रतिकुरवपुर, कामरशेत-कुडतरी येथील श्री श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थान ट्रस्टचा ३४ वा वर्धापन दिन सोहळा सोमवार, २० व मंगळवार, २१ एप्रिल या कालावधीतील विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
२० रोजी सकाळी ८ वाजता श्री देवता प्रार्थना, श्रीगणेश पूजन, स्वस्ती पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्यादिवरण, स्थळशुद्धी, श्री देवता स्थापना पूजन अन्य विधी होतील. सायंकाळी ७.३० वाजता वसंतपूजा होईल. त्यानंतर रात्री ८ वाजता 'स्वर दत्त' या भक्तीगीत, भावगीत, नाट्यगीत व कोंकणी गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमानंतर फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
२१ रोजी ब्रह्मकलश अभिषेक व रुद्रपारायण होम पार पडणार आहे. दुपारी १ वाजता महाआरती व महाप्रसाद होईल. तसेच रात्री ८.३० वाजता पालखी सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
Web Summary : The Shripad Shrivallabh Devasthan Trust, Kamarshet-Kudtari, celebrates its 34th anniversary with religious programs on April 20-21. Events include prayers, Abhishek, Rudraparayan Hom, Vasant Pooja, devotional music, and a Palkhi procession. A Mahaprasad will also be offered to devotees.
Web Summary : कामरशेत-कुडतरी स्थित श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थान ट्रस्ट 20-21 अप्रैल को 34वां वार्षिकोत्सव मनाएगा। प्रार्थना, अभिषेक, रुद्रपरायण होम, वसंत पूजा, भक्ति संगीत और पालकी जुलूस सहित धार्मिक कार्यक्रम होंगे। भक्तों को महाप्रसाद भी दिया जाएगा।