शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

मोपा येथे विमानतळ उभारण्याचा मार्ग मोकळा, न्यायालयाकडून दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 14:54 IST

Mopa Airport : गोव्यातील मोपा येथे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पणजी - गोव्यातील मोपा येथे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठीचा जो पर्यावरणविषयक दाखला (ईसी) निलंबित करण्यात आला होता. तो सर्वोच्च न्यायालयाने परत दिला आहे. मात्र केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रायाने ज्या अटी घालून दिलेल्या आहेत, त्याचे पालन संबंधितांना करावे लागेल.

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर गोव्यातील पेडणे हा तालुका असून त्या तालुक्यात मोपा विमानतळाचे  काम काही वर्षापूर्वी सुरू झाले होते. 2016 साली लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्रीपदी असताना जीएमआर कंपनीशी विमानतळाच्या बांधकामासाठी सरकारचा करार झाला होता. विमानतळाच्या कामासाठी पन्नास हजारपेक्षा जास्त झाडे कापली गेली. विमानतळ उभा राहिल्यास गोवा सरकारला 36 टक्के महसूल मिळणे अपेक्षित होते. तथापि, विमानतळाचे बांधकाम अलिकडील काळात बंद राहिल्याने कंत्राटदार कंपनीलाही फटका बसला व गोवा सरकारचीही अडचण झाली. अन्यथा येत्या डिसेंबर महिन्यात विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असते. आता हे काम डिसेंबरमध्ये पूर्ण होऊ शकणार नाही पण नव्याने बांधकाम सुरू होईल.

28 ऑक्टोबर 2015 रोजी केंद्रीय वन मंत्रालयाकडून मोपा विमानतळाला पर्यावरणविषयक दाखला दिला गेला होता. तो मार्च 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निलंबित केला होता व पर्यावरणविषयक तज्ज्ञ समितीने नव्याने अभ्यास करावा असे न्यायालयाने सूचविले होते. सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय वन मंत्रालयाची व जीएमआर कंपनीचीही बाजू ऐकून घेतली होती. विविध बाजूने युक्तीवाद झाले. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी केंद्रीय वन मंत्रालयाच्याबाजूने बाजू मांडली. विमानतळासाठी देण्यात आलेला ईसी सदोष असल्याचा दावा करून एका एनजीओने हरित लवादाकडे धाव घेतली होती. झाडे कापण्याचा विषय वादात सापडला होता. त्यामुळे नव्याने पर्यावरणविषयक परिणाम अभ्यास करून घ्यावा लागला. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निवाडा दिला व बांधकामावरील र्निबध उठविले. संबंधितांनी अटींचे पालन करावे. निरीकडून त्यावर लक्ष ठेवले जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :goaगोवाAirportविमानतळ