शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

आढाव्यानंतर

By admin | Updated: June 6, 2014 01:55 IST

पणजी : येत्या सप्टेंबरमध्ये आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांच्या प्रगतीचा आपण आढावा घेईन, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी येथे जाहीर केले.

पणजी : येत्या सप्टेंबरमध्ये आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांच्या प्रगतीचा आपण आढावा घेईन, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी येथे जाहीर केले. तथापि, मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक तपासल्यानंतर मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची फेररचना करून मंत्रिमंडळात सुधारणा करतील की फक्त आढावाच घेऊन गप्प राहतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंत्र्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी विदेश दौर्‍यावरून आल्यानंतर प्रथम जाहीर करून काही मंत्र्यांशी चर्चाही सुरू केली होती. त्यांच्या खात्यांबाबत, त्यांच्या कामांबाबत मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांशी बोलणी केली होती. वीजमंत्री मिलिंद नाईक, पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर आदींनी त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी व पक्षाने सांगितले तर आपण कधीही पद सोडण्यास तयार आहोत, असे जाहीर केले होते. नागरी पुरवठा खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या प्रगतीचा आढावा मात्र त्या वेळीही घेतला गेला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण जनतेला आपल्या मंत्रिमंडळाचे रिपोर्ट कार्ड सादर करीन, असे काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री गुरुवारी येथील ईडीसी प्रकल्पात एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त आले असता, पत्रकारांनी त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या प्रगतीविषयी विचारले असता, ते म्हणाले की, मंत्र्यांच्या प्रगतीचा आढावा निश्चितच घेतला जाईल. मात्र, त्यासाठी सप्टेंबरपर्यंत थांबावे लागेल. आपले सरकार ९ मार्च रोजी अधिकारावर आले होते. सरकारला येत्या सप्टेंबरमध्ये अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. तोपर्यंत तरी सर्वांनी थांबावे. (खास प्रतिनिधी)