आढाव्यानंतर

By Admin | Updated: June 6, 2014 01:55 IST2014-06-06T01:50:48+5:302014-06-06T01:55:35+5:30

पणजी : येत्या सप्टेंबरमध्ये आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांच्या प्रगतीचा आपण आढावा घेईन, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी येथे जाहीर केले.

After review | आढाव्यानंतर

आढाव्यानंतर

पणजी : येत्या सप्टेंबरमध्ये आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांच्या प्रगतीचा आपण आढावा घेईन, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी येथे जाहीर केले. तथापि, मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक तपासल्यानंतर मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची फेररचना करून मंत्रिमंडळात सुधारणा करतील की फक्त आढावाच घेऊन गप्प राहतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मंत्र्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी विदेश दौर्‍यावरून आल्यानंतर प्रथम जाहीर करून काही मंत्र्यांशी चर्चाही सुरू केली होती. त्यांच्या खात्यांबाबत, त्यांच्या कामांबाबत मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांशी बोलणी केली होती. वीजमंत्री मिलिंद नाईक, पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर आदींनी त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी व पक्षाने सांगितले तर आपण कधीही पद सोडण्यास तयार आहोत, असे जाहीर केले होते. नागरी पुरवठा खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या प्रगतीचा आढावा मात्र त्या वेळीही घेतला गेला नव्हता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण जनतेला आपल्या मंत्रिमंडळाचे रिपोर्ट कार्ड सादर करीन, असे काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री गुरुवारी येथील ईडीसी प्रकल्पात एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त आले असता, पत्रकारांनी त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या प्रगतीविषयी विचारले असता, ते म्हणाले की, मंत्र्यांच्या प्रगतीचा आढावा निश्चितच घेतला जाईल. मात्र, त्यासाठी सप्टेंबरपर्यंत थांबावे लागेल. आपले सरकार ९ मार्च रोजी अधिकारावर आले होते. सरकारला येत्या सप्टेंबरमध्ये अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. तोपर्यंत तरी सर्वांनी थांबावे. (खास प्रतिनिधी)

Web Title: After review