पेडणेतील ९९ टक्के हॉटेल्स बेकायदा

By Admin | Updated: June 9, 2015 00:32 IST2015-06-09T00:32:41+5:302015-06-09T00:32:51+5:30

पणजी : पेडणेतील किनारपट्टी भागातील ९९ टक्के हॉटेल्स ही बेकायदेशीर आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली

99% of the pedestrian hotels are illegal | पेडणेतील ९९ टक्के हॉटेल्स बेकायदा

पेडणेतील ९९ टक्के हॉटेल्स बेकायदा

पणजी : पेडणेतील किनारपट्टी भागातील ९९ टक्के हॉटेल्स ही बेकायदेशीर आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तेरेखोल प्रकल्पाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, तेरेखोलचा प्रकल्प बंद करण्याचा प्रश्नच नाही. कायद्याला बगल देऊन कोणतेही काम केले जाणार नाही याची खबरदारी सरकारकडून घेतली जाईल. या प्रकल्पासाठीचे सर्व कायदेशीर सोपस्कार प्रकल्प व्यवस्थापनाने पूर्ण केले आहेत. सर्व आवश्यक दाखले मिळवले आहेत.
भूमी रूपांतरण शुल्क सरकारला फेडले आहे. त्यामुळे पूर्णपणे कायदेशीर असलेला हा प्रकल्प बंद पाडण्याचा विषयच उद्भवत नाही. तेरेखोल प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प आणखी तीन आले तरी ते पेडणे तालुक्यासाठी चांगले आहेत. त्यामुळे विकास होणार आहे, असे ते म्हणाले.
कायदेशीरतेविषयी ते म्हणाले की, पेडणे तालुक्याच्या किनारपट्टी भागातील ९० टक्के हॉटेल्स ही बेकायदेशीर आहेत. तेरेखोल येथील प्रकल्पाला विरोध करणारे या बेकायदेशीर बांधकामांविषयी बोलत नाहीत. (प्रतिनिधी)

Web Title: 99% of the pedestrian hotels are illegal