शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

मंत्र्यांच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पगारावर 61 लाखांचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 8:08 PM

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांच्या सेवेतील किंवा कार्यालयातील कर्मचाऱ्याची संख्या एकूण 151 आहे व त्यांच्या वेतनावर दरमहा 61 लाख रुपयांचा खर्च होतो.

ठळक मुद्दे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांच्या सेवेतील किंवा कार्यालयातील कर्मचाऱ्याची संख्या एकूण 151 आहे व त्यांच्या वेतनावर दरमहा 61 लाख रुपयांचा खर्च होतो. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याविषयीची माहिती लेखी स्वरुपात विधानसभेत सादर केली आहे.पूर्वीचे मंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावांसह त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चाची माहिती दिली.

पणजी -  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांच्या सेवेतील किंवा कार्यालयातील कर्मचाऱ्याची संख्या एकूण 151 आहे व त्यांच्या वेतनावर दरमहा 61 लाख रुपयांचा खर्च होतो. याविषयीची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लेखी स्वरुपात विधानसभेत सादर केली आहे.पूर्वीचे मंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावांसह त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चाची माहिती दिली गेली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात 23 कर्मचारी आहेत. त्यांच्या वेतनावर दरमहा 13 लाख 74 हजार 298 रुपये खर्च होतात. विनोद पालयेंकर मंत्री होते तेव्हा त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 6 लाख 12 हजार रुपये खर्च होत असे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या सेवेत एकूण 17 कर्मचारी आहेत. त्यांच्या वेतनावर दरमहा 6 लाख 8 हजार 370 रुपये खर्च होतात. वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांच्या कार्यालयात एकूण 15 कर्मचारी आहेत व त्यावर 6 लाख 2 हजार रुपये दर महिन्याला खर्च होतात. 

कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या 14 आहे व त्यांच्या वेतनावर एकूण 5 लाख 29 हजार रुपये सरकारी तिजोरीतून खर्च केले जातात. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या कार्यालयांमध्ये एकूण 15 कर्मचारी आहेत व त्यांच्या पगारापोटी सरकार 5 लाख 58 हजार रुपये खर्च करते, असे उत्तरावरून स्पष्ट होत आहे. नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांच्याकडे फक्त पाचच कर्मचारी आहेत व त्यांच्या वेतनावर सरकार दर महिन्याला 3 लाख 92 हजार रुपये खर्च करते. विजय सरदेसाई उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे 11 कर्मचारी होते व त्यांच्या वेतनावर सरकार दरमहा 3 लाख 81 हजार रुपये खर्च करत होते.

विद्यालयाजवळील जंक्शनवर वाहतूक पोलीस ठेवू - मुख्यमंत्रीराज्यातील विद्यालयाजवळील जंक्शनवर वाहतुकीची कोंडी होत असेल तर सकाळी व सायंकाळच्यावेळी व दुपारीही वाहतूक पोलीस ठेवण्याची व्यवस्था सरकार करील, असे  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी (23 जुलै) विधानसभेत जाहीर केले आहे. काँग्रेसचे नावेली मतदारसंघाचे आमदार  लुइझिन फालेरो यांनी मूळ प्रश्न मांडला होता. नावेली येथे हायस्कुल, हायरसेकंडरी, कॉलेज असलेल्या ठिकाणी पंधरा वर्षापूर्वी आपण वाहतूक सिग्नलची व्यवस्था केली होती. महामार्ग रुंदीकरणावेळी ते सिग्नल काढून टाकले गेले. तिथे आता वाहतुकीची प्रचंड कोंडी होते, असे फालेरो यांनी सांगितले. बांधकाम खात्याकडे अनेकदा पत्र व्यवहार केला तरी प्रश्न सुटला नाही. माजी मुख्यमंत्र्यांनी मला चारवेळा प्रश्न सोडविण्याचे आश्वासनही दिले होते, असे फालेरो यांनी सांगितले आहे. सिग्नल होईल तेव्हा होईलच पण अगोदर त्या हायस्कुलकडे वाहतूक पोलिसाची सोय करावी, अशीही मागणी फालेरो यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली. वार्का येथेही अशाच प्रकारे वाहतूक कोंडी होते व तिथेही वाहतूक पोलीस असायला हवा, असे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव म्हणाले. राज्यात ज्या ज्या ठिकाणी विद्यालये आहेत व जंक्शनमुळे वाहतूक कोंडी होते, तिथे वाहतूक पोलीस नियुक्त केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपा