शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

वास्को येथील २२ विकासप्रकल्पांना वेग: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:05 IST

१४० कोटींच्या निधीतून 'नवीन वास्को' उभे राहणार; २.५ कोटींच्या 'अंडरपास' पुलाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : शहरात सध्या २२ महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांची कामे जोरात सुरू असून येथील विकासाची गती पाहता आमदार कृष्णा साळकर हे दिवस-रात्र शहराच्या प्रगतीसाठी कार्यरत असल्याचे स्पष्ट दिसून येते.

भविष्यात वास्कोच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने १४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यामुळे शहरात अभूतपूर्व बदल घडून 'नवीन विकसित वास्को' नागरिकांना पाहायला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

काल बुधवारी (दि. ६) येथील एका महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या उद्घाटनासह दोन प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमानिमित्त आयोजित समारंभात मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. तानिया हॉटेल परिसरातील रेल्वे पुलाखालील कमी उंचीमुळे मांगोरहिल भागात आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक दलाला वळसा घालून जावे लागत होते. ही अडचण दूर करण्यासाठी सुमारे २.५ कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या 'अंडरपास' पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी वास्कोत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

याच वेळी ५४ कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येणाऱ्या मल्टीपर्पज क्रीडा संकुलाच्या तसेच ८.५ कोटी रुपये खर्चाच्या मुख्याधिकारी बंगल्याच्या जागेवरील व्यावसायिक इमारत प्रकल्पाच्या पायाभरणीही करण्यात आली. कार्यक्रमाला वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, क्रीडामंत्री रमेश तवडकर, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार कृष्णा साळकर, आमदार संकल्प आमोणकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, माजी नगराध्यक्ष दीपक नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

वास्को हे 'गेटवे ऑफ गोवा'

उद्घाटनानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी आमदार साळकर यांच्या कार्याची प्रशंसा केली. चार वर्षांत वास्कोमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वास्को हे गोव्यातील सर्वात जुने शहर असून येथे पहिले रेल्वे स्थानक, विमानतळ आणि बंदर असल्याने 'गेटवे ऑफ गोवा' म्हणून ओळखले जाते. मात्र मागील काही वर्षे विकासाच्या दृष्टीने शहराकडे दुर्लक्ष झाल्याने अपेक्षित प्रगती झाली नव्हती. साळकर आमदार झाल्यानंतर त्यांनी विकासकामांना गती दिल्याचे सावंत यांनी नमूद केले.

'बसस्थानक प्रकल्प 'पीपीपी' तत्त्वावर'

सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या १४० कोटी रुपयांच्या निधीतून अनेक प्रकल्प लवकरच सुरू होणार असून केवळ पाच किलोमीटर क्षेत्रफळाच्या वास्कोमध्ये व्यापक बदल दिसून येतील. बसस्थानक प्रकल्प 'पीपीपी' तत्वावर उभारण्यात येणार असून नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील.

काही राजकीय विरोधक या प्रकल्पाला विरोध करत असले तरी तो पूर्णतः नागरिकांच्या हिताचा असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. राज्यातील सरकारने काही वर्षात मोठ्या प्रमाणात विकास केला असून 'डबल इंजिन' सरकारमुळे भविष्यातही विकासाची गती कायम राहील. ५४ कोटींच्या क्रीडा संकुल प्रकल्पाचे काम दीड वर्षात पूर्ण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडामंत्री तवडकर यांनी वास्कोतील विकासकामांची गती अधोरेखित करत क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट सुविधा उभारण्यावर भर दिला. २०३७ मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचे ध्येय ठेवण्यात आले असून त्यासाठी गोव्यात क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आमदार साळकर यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल आभार मानत १४० कोटींच्या निधीमुळे वास्कोमध्ये मोठा विकास घडेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमात वाहतूकमंत्री गुदिन्हो, आमदार आमोणकर, नगराध्यक्ष बोरकर आदींचीही भाषणे झाली. समारंभाचे सूत्रसंचालन बायणा रवींद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव यांनी केले.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Vasco Development Projects Accelerated: Chief Minister Pramod Sawant

Web Summary : Chief Minister Pramod Sawant announced rapid progress on 22 Vasco development projects, fueled by a ₹140 crore fund. An underpass opened, a sports complex and commercial building broke ground, promising significant transformation for Vasco, driven by proactive leadership.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत