शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. सदस्य तुलावींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST

शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती. या निवडणुकीसाठी प्रभाकर तुलावी हे येणार असल्याची कानकुन पोलिसांना लागली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर नजर ठेवली होती. जिल्हा परिषदेत मतदानाची प्रक्रिया आटोपताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुलावी यांना ताब्यात घेतले. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

ठळक मुद्देअपहरण प्रकरण : मतदानासाठी आले होते गडचिरोलीत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीदरम्यान अपक्ष उमेदवार बग्गुजी ताडाम यांचे अपहरण केल्याच्या प्रकरणात कुरखेडा तालुक्यातील पलसगड-पुराडा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य प्रभाकर तुलावी यांना गडचिरोली जिल्हा परिषद येथून शुक्रवारी अटक करण्यात आली.बग्गुजी ताडाम यांनी आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्यासह ११ जणांवर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लॉरेन्स गेडाम व अन्य सहा जण पोलिसांसमोर शरण आले. सध्या ते कारागृहात आहेत. मात्र या प्रकरणातील आनंदराव गेडाम, जीवन नाट यांच्यासह प्रभाकर तुलावी हे अन्य काही जण उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतरही फरार होते.शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती. या निवडणुकीसाठी प्रभाकर तुलावी हे येणार असल्याची कानकुन पोलिसांना लागली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर नजर ठेवली होती. जिल्हा परिषदेत मतदानाची प्रक्रिया आटोपताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुलावी यांना ताब्यात घेतले. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तुलावी यांच्या विरोधात आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असल्याने तुलावी यांना आरमोरी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.या प्रकरणात माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्यासह माजी जि.प.उपाध्यक्ष जीवन नाट तथा इतर अनेक आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. त्यापैकीच जि.प. सदस्य प्रभाकर तुलावी हेसुद्धा एक आहेत. इतर आरोपींनाही अटक करणार का, अशी कुजबूज सुरू होती.आताच तुलावींचा पत्ता कसा काय मिळाला?मागील तीन महिन्यांपासून तुलावी हे संपर्कक्षेत्राच्या बाहेर आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तुलावी इतर सहकाऱ्यांसोबत जिल्हा परिषदेत बरोबर पोहोचले. पोलिसांना त्यांचा इतके दिवस थांगपत्ता लागत नसताना राजकीय पदाधिकाऱ्यांनाच ते कसे काय गवसले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणArrestअटक