शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी तालुक्यात फवारणी जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 02:02 IST

मलेरिया, डेंग्यू व अन्य प्राणघातक रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी हिवताप व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने अहेरी तालुक्यात १ नोव्हेंबर २०१५ पासून औषध फवारणीचे काम सुरू आहे.

मलेरिया निर्मूलनावर भर : महागाव परिसरात फवारणी सुरूअहेरी : मलेरिया, डेंग्यू व अन्य प्राणघातक रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी हिवताप व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने अहेरी तालुक्यात १ नोव्हेंबर २०१५ पासून औषध फवारणीचे काम सुरू आहे. हिवताप विभागाच्या फवारणी पथकातर्फे सदर काम गावागावात सुरू आहे. गडचिरोलीचे जिल्हा हिवताप अधिकारी रवींद्र ढोले यांच्या आदेशान्वये हंगामी फवारणी पथक अहेरी तालुक्यात दाखल झाले असून कीटकजन्य औषध फवारणीच्या कामाला गती आली आहे. आतापर्यंत तालुक्यातील देचलीपेठा, जिमलगट्टा व कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमध्ये फवारणीचे काम पूर्ण झाले आहे. तर तालुक्यातील महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमध्ये फवारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. महागाव केंद्रांतर्गत अहेरीच्या प्राणहिता पोलीस मुख्यालय व सीआरपीएफ बटालीयन ७ च्या निवासस्थानापासून औषध फवारणीचा शुभारंभ करण्यात आला. अहेरी तालुक्यातील मलेरिया पथकातील तांत्रिक पर्यवेक्षक पंकज नैनुरवार यांच्या नेतृत्वात फवारणी सुरू आहे. अहेरी तालुक्यात १०० टक्के फवारणी पूर्ण करण्याचे नियोजन मलेरिया विभागाने केले आहे. या फवारणीच्या कामात आरोग्य विभागासह ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थांचे सहकार्य असणे आवश्यक आहे. सर्व गावातील नागरिकांनी आपल्या घरात संपूर्ण खोल्यांमध्ये औषध फवारणी करून घ्यावी, अशा सूचना जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)