जि.प. च्या माध्यमातून विकासाला गती देणार

By Admin | Updated: April 4, 2017 00:54 IST2017-04-04T00:54:48+5:302017-04-04T00:54:48+5:30

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर एका आठवड्याच्या आत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी १२०० कोटी रूपयांची तरतूद राज्य सरकारने करावी, ...

Zip Speed ​​up development through | जि.प. च्या माध्यमातून विकासाला गती देणार

जि.प. च्या माध्यमातून विकासाला गती देणार

योगीता भांडेकर : १२०० कोटींच्या तरतुदींसाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर
रत्नाकर बोमिडवार चामोर्शी
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर एका आठवड्याच्या आत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी १२०० कोटी रूपयांची तरतूद राज्य सरकारने करावी, यासंदर्भाचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे. जि. प. च्या माध्यमातून जिल्हा विकासाला गती देण्यासाठी आपण प्रसंगी धाडसी निर्णय घेणार, अशी माहिती जि. प. चे अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी दिली.
प्रस्तुत प्रतिनिधींनी जि. प. अध्यक्ष भांडेकर यांच्याशी संवाद साधून चर्चा केली. याप्रसंगी भांडेकर यांनी जिल्हा विकासाच्या विविध संकल्पना मनमोकळेपणाने मांडल्या. एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रशस्त इमारती तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी होणे गरजेचे आहे. यासाठी १२०० कोटींचा निधी आवश्यक आहे. शेतकऱ्यांची धान विक्री व्यवहारातील लूट थांबण्यासाठी कृषी गोदामांची गडचिरोली जिल्ह्यात संख्या वाढणे आवश्यक आहे. ग्राम पंचायतस्तरावर कृषी गोदाम निर्माण करण्यासाठी ३० कोटी रूपये, दुर्गम भागात आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी १६ प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत व कर्मचारी वसाहतीसाठी ६३ कोटी ६९ लाख रूपयांचा प्रस्ताव आपण तयार केला आहे. याशिवाय शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण आदी विभागाच्या योजनांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे.
३० मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांचा आढावा घेऊन हे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. सदर प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्ह्यातील आमदारांकडे सादर करण्यात आले आहेत. या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हा विकासासाठी निधी मिळण्याकरिता आपण पाठपुरावा करणार, अशी माहिती जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी यावेळी दिली.
५१ जिल्हा परिषद क्षेत्र व १०२ पंचायत समिती गण आणि ४५६ ग्राम पंचायती असा अवाढव्य पसरलेल्या गडचिरोली जिल्हा परिषदेचा कारभार महिला पदाधिकाऱ्यांनी पाहणे मोठे आव्हानात्मक आहे. पुरूषप्रधान संस्कृतीत ग्रामीण क्षेत्राचा विकास करण्याची जबाबदारी महिलेने स्वीकारली. हे एकप्रकारचे धाडसच आहे. हे धाडस केले, चामोर्शी तालुक्यातील वालसरा येथील योगीता मधुकर भांडेकर या २७ वर्षीय महिलेने. योेगीतांनी समन्वयातून विकासाचा मानस व्यक्त केला आहे.

अर्थशास्त्रातून झाले उच्च शिक्षण
योगीता मधुकर भांडेकर या पूर्वश्रमीच्या योगिता रिंगाजी सोमनकर होत. मूळचे आरमोरी परंतु ब्रह्मपुरी येथे स्थाईक झालेले व तहसील कार्यालयात लिपीक पदावर असलेले रिंगाजी सोमनकर यांची योगीता ही मुलगी आहे. योगीताचा नकूल नामक एक भाऊ अमरावती येथे जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहे. दुसरा भाऊ प्रणव याने बी.कॉम.चे शिक्षण पूर्ण केले असून तो आता स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. स्वत: योगीताने अर्थशास्त्र विषयात एम.ए.बी.एड्. चे शिक्षण पूर्ण केले. सुशिक्षित व सुसंस्कारीत कुटुंबात योगीताचा जन्म झाला.

सासरकडून मिळाला राजकीय वारसा
योगीता सोमनकर यांचा विवाह वालसरा येथील मधुकर केशव भांडेकर यांचेशी २०१४ मध्ये झाला. माहेरकडून कोणताही राजकीय वा सामाजिक वारसा योगीतांना लाभला नाही. मात्र लग्नानंतर राजकीय व सामाजिक क्षेत्राशी घनिष्ठ संबंध असलेल्या भांडेकर कुटुंबीयांकडून योगीताला राजकारणाचे बाळकडू मिळाले. राजकीय सामाजिक वारसा लाभलेल्या भांडेकर घराण्याची योगीता सून झाली. केवळ तीन वर्षात सासरकडील मंडळीच्या प्रेरणेने सामाजिक व राजकीय क्षेत्रात योगीताने आपले पाय घट्ट रोवले. पती मधुकर भांडेकर हे सिव्हील व मेकॅनिकल डिप्लोमा प्राप्त असून स्वयंरोजगार करतात. योगीता व मधुकर या दाम्पत्याला दीड वर्षाची स्वरा नामक मुलगी आहे. योगीताचा दीर रामचंद्र नागपूर जिल्ह्याच्या पंचायत समिती कार्यालयात शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहे.

Web Title: Zip Speed ​​up development through

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.