शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शिक्षकांचे घेणार आता ‘लाईव्ह लोकेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

विद्यार्थ्यांना सुटी असल्याने बहुतांश शिक्षक शाळेला बुट्टी मारण्याची शक्यता होती. प्रत्येक शिक्षक उपस्थित राहावा, यासाठी शिक्षकांना त्यांच्या अ‍ॅन्ड्राईड मोबाईलवरून लाईव्ह लोकेशन घेणे आवश्यक आहे. प्रत्येक केंद्राचा एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. या केंद्राच्या ग्रुपमध्ये किंवा केंद्रप्रमुखाच्या स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप लाईव्ह लोकेशन टाकणे सक्तीचे केले आहे.

ठळक मुद्देगुगल मॅपची मदत । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यालयी राहणे सक्तीचे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्या जाहीर केल्या आहेत. मात्र शिक्षक, मुख्याध्यापक यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करण्यात आले. प्रत्येक शिक्षक मुख्यालयी वेळेवर पोहोचतो किंवा नाही, याचे गुगल मॅपवर लाईव्ह लोकेशन घेऊन ते केंद्र प्रमुखांच्या वॉट्सअ‍ॅपवर टाकायचे आहेत. केंद्रप्रमुख सदर लोकेशन संवर्ग विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना सादर करतील. यावरून सदर शिक्षकाच्या हजेरीची नोंद घेतली जाणार आहे.कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी राज्यभरात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. कोरोनाचा संसर्ग विद्यार्थ्यांना होऊ नये, यासाठी राज्यभरातील सर्वच माध्यमाच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र या कालावधीत शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. सुट्यांच्या कालावधीतही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्याच्या संपर्कात राहावा, यासाठी सर्वच शिक्षकांना शाळेच्या कालावधीत शाळेत उपस्थित राहाणे सक्तीचे केले आहे.विद्यार्थ्यांना सुटी असल्याने बहुतांश शिक्षक शाळेला बुट्टी मारण्याची शक्यता होती. प्रत्येक शिक्षक उपस्थित राहावा, यासाठी शिक्षकांना त्यांच्या अ‍ॅन्ड्राईड मोबाईलवरून लाईव्ह लोकेशन घेणे आवश्यक आहे. प्रत्येक केंद्राचा एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. या केंद्राच्या ग्रुपमध्ये किंवा केंद्रप्रमुखाच्या स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप लाईव्ह लोकेशन टाकणे सक्तीचे केले आहे. यामुळे शिक्षक किती वाजता शाळेत पोहोचला हे कळू शकते. ज्या गावांमध्ये नेटवर्क उपलब्ध नाही, अशा गावातील शिक्षकांनी जिथे नेटवर्क उपलब्ध असेल त्या ठिकाणचे लाईव्ह लोकेशन टाकणे सक्तीचे केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या नवीन निर्णयामुळे कामचुकार शिक्षकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.वर्षभर अशी हजेरी आवश्यकदुर्गम भागात कार्यरत असलेले बहुतांश शिक्षक शाळेवर नियमित जात नाही. दोन शिक्षकी शाळेतील शिक्षक आळीपाळीने शाळेत जातात. मात्र त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नाही. लाईव्ह लोकेशनच्या माध्यमातून शिक्षकांची हजेरी हा शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्याचा चांगला उपाय ठरू शकतो. त्यामुळे हा उपक्रम वर्षभर राबविल्यास याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.असे घेतले जाते लाईव्ह लोकेशनज्या व्यक्तीला लाईव्ह लोकेशन पाठवायचे आहे, त्या व्यक्तीचा व्हॉट्सअ‍ॅप उघडून अटॅच या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर गुगलचे लोकेशन येते. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, त्या ठिकाणचे लोकेशन गुगलवर दाखविते. त्यानंतर शेअर लाईव्ह लोकेशन केल्यानंतर त्याचा फोटो संबंधित व्यक्तीला पाठविला जातो. यामध्ये पाठविणारा नेमका कोणत्या ठिकाणी उभा आहे, हे दिसून येते.

टॅग्स :Teacherशिक्षक