शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात वीज चोरीवर राहणार करडी नजर

By admin | Updated: August 25, 2016 01:10 IST

गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते.

मंडळांना वीज दरात सवलत : महावितरणतर्फे स्वतंत्र पथकाची निर्मितीगडचिरोली : गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. मात्र अनेक गणेश मंडळ महावितरणकडून रितसर वीज जोडणी घेत नाही. अशा गणेश मंडळांकडून वीज तारांवर आकोडे टाकून वीज चोरी केली जाते. गणेश उत्सवादरम्यान वीज चोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महावितरणच्या वतीने स्वतंत्र पथक गठित करण्यात आले आहे. या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गणेशोत्सवातील वीज चोरीवर करडी नजर राहणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळाकडून वीज चोरीचे प्रकार होऊ नयेत, यासाठी महावितरणच्या वतीने गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक मंडळांना वीज दरात विशेष सवलत देण्यात आली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना प्रतियुनिट ३ रूपये ७१ पैसे दराने अधिकृत तात्पुरत्या स्वरूपाची वीज जोडणी देण्यात येणार आहे. सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीज जोडणीसाठी प्रतियुनिट ३ रूपये ७१ पैसे अधिक इंधनअधीभार असे वीज दर ठेवण्यात आले आहे. सदर वीज दर घरगुती वीज दरापेक्षाही कमी आहे. त्यामुळे घरगुती अथवा वाणिज्य वीज जोडणीतून गणेशोत्सवासाठी अनाधिकृतरित्या वीज पुरवठा घेतल्यास तो आर्थिकदृष्ट्या महागडा राहणार आहे. धार्मिक उत्सवाकरिता अधिकृतच वीज पुरवठा घ्यावा आणि त्यासाठी सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व मिळावे, या उद्देशाने तात्पुरत्या वीज जोडणीचा दर घरगुती वीज दरापेक्षा कमी ठेवण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप अथवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीज व्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घ्यावी, तसेच गरज पडल्यास महावितरणच्या त्या-त्या भागातील अभियंत्यांशी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी) वीज व्यवस्थेत अशी घ्या काळजीसार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्याच्या परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, जेणेकरून अप्रिय घटना व धोका होणार नाही.वीज पुरवठा व जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे. वीज पुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहीत झाल्याने प्राणांकित अपघात होण्याची शक्यता असते. जवळच्या वीज खांबावरून अथवा वीज वाहिन्यांवर आकोडे टाकून गणेश मंडळांनी वीज पुरवठा घेऊ नये, यामुळे जीवित व वित्तहानी होण्याचा धोका अधिक असते.वीज जोडणीसाठी लागणारी तार अथवा केबल वीजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी. तुटलेली अथवा लूज तार वापरू नये, अशी तार वापरावयाची असल्यास प्रमाणित इन्सुलेशन टेप लावून जोडावी.