येनापूर हे मोठे गाव म्हणून ओळखले जात असून आरोग्याची समस्या लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून येथे आरोग्य पथक कार्यरत आहे. मात्र या आरोग्य पथकात गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने हे पथक एनआरएचएमच्या भरोशावर आरोग्य सेवा पुरवित होते. मात्र कोरोना महामारीचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. येनापूर येथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी साेमनपल्लीचे सरपंच नीलकंठ निखाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली हाेती. याची दखल घेत या आराेग्य पथकात वैद्यकीय अधिकारी म्हणून डाॅ. सचिन देठे यांची नियुक्ती केली आहे. संरपच निखाडे यांनी डाॅ. देठे यांचा पुष्पगुच्छ सत्कार केला. यावेळी प्राचार्य अशोक वाकूडकर, वासुदेव गोंगले, बालभाऊ निखाडे, किशोर ठुसे, विश्वास बेमकंटीवार, नितीन खिरटकर, चंदू पुच्छावार उपस्थित होते.
येनापूर आरोग्य पथकाला मिळाले ३ वर्षानंतर वैद्यकीय अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:38 IST