शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ओबीसी विद्यार्थ्यांनाही गणवेश मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

सोमवारी ओबीसी महासंघाच्या पदाधिकाºयांनी जि.प.कार्यालय गाठून पदाधिकाºयांची भेट घेतली. त्यांच्यापुढे ओबीसी विद्यार्थ्यांच्या गणवेशाची समस्या मांडली. समग्र शिक्षा अभियानांतर्गत जि.प.शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थिनी तसेच एससी, एसटी, एनटी/व्हीजे तसेच बीपीएल कुटुंबातील विद्यार्थ्यांनाच जि.प.प्रशासनामार्फत दोन गणवेश मोफत दिले जातात

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे आश्वासन : ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात समग्र शिक्षा अभियानांतर्गत जि.प. शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्याची मागणी ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने जि.प. पदाधिकाऱ्यांकडे केली. त्यावर ओबीसी विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्याचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने अध्यक्ष अजय कंकडालवार व उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती मनोहर पोरेटी यांनी शिष्टमंडळाला दिली.सोमवारी ओबीसी महासंघाच्या पदाधिकाºयांनी जि.प.कार्यालय गाठून पदाधिकाºयांची भेट घेतली. त्यांच्यापुढे ओबीसी विद्यार्थ्यांच्या गणवेशाची समस्या मांडली. समग्र शिक्षा अभियानांतर्गत जि.प.शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थिनी तसेच एससी, एसटी, एनटी/व्हीजे तसेच बीपीएल कुटुंबातील विद्यार्थ्यांनाच जि.प.प्रशासनामार्फत दोन गणवेश मोफत दिले जातात. मात्र जि.प.शाळांमध्ये शिकणारे ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी गणवेश योजनेपासून वंचित राहतात. एका बाकावर बसणाºया विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये गणवेशामुळे विषमता निर्माण होऊ शकते. न्यूनगंडता टाळण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा गणवेश देण्यात यावा, अशी मागणी ओबीसी महासंघाच्या पदाधिकाºयांनी केली. यावर सकारात्मक आश्वासन देत ओबीसी व खुल्या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना यंदाच्या सत्रात शालेय गणवेश उपलब्ध करून देऊ, असे अध्यक्षांनी सांगितले.शिष्टमंडळाच्या वतीने यावेळी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी महासंघाचे राष्टÑीय उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जीवन नाट, जि.प.सदस्य विनोद लेनगुरे, संजय चरडुके, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, सचिव प्रा.देवानंद कामडी, कार्याध्यक्ष विनायक बांदुरकर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, जि.प.शाळांमध्ये बहुतांश गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. यामध्ये सर्व समाजातील व घटकातील विद्यार्थ्यांचा समावेश असतो. यंदा कोरोनामुळे सर्वसामान्य पालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे गणवेशाचा प्रश्न सोडण्याची मागणी केली आहे.निधीची अडचण, तरीही सोय करूयावर्षी कोरोनाच्या संकटामुळे जिल्हा परिषदेला प्राप्त होणाºया अनुदानामध्ये कपात होण्याची शक्यता आहे. असे जरी असले तरी विद्यार्थ्यांना व शिक्षणाला प्राथमिकता देऊन ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत गणवेश देऊ, असे ठोस आश्वासन पदाधिकाºयांनी दिले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदOBCअन्य मागासवर्गीय जाती