शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांनो, संघटित व्हा!

By admin | Updated: December 31, 2016 02:32 IST

बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र इमारत

संजय मंडवघटे यांचे आवाहन : आरमोरीत बांधकाम कामगारांचा मेळावा आरमोरी : बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यरत आहे. मात्र लाखो बांधकाम कामगार यात नोंदणी न करता लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे सर्व खऱ्या बांधकाम कामगारांनी या मंडळात नोंदणी करून लाभ मिळण्यासाठी व हक्कांसाठी लढा देण्यासाठी संघटित व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना फेडरेशनचे महासचिव संजय मंडवघटे यांनी केले. आरमोरी येथील टिळक चौकातील दुर्गा मंदिर देवस्थानात आयोजित बांधकाम कामगाराच्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार नेते डॉ. महेश कोपुलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. सदस्य अमोल मारकवार, आयटकचे विनोद झोडगे, अ‍ॅड. जगदीश मेश्राम, चंद्रभान मेश्राम, देवराव चवळे, भगवान चुधरी उपस्थित होते. १९९६ मध्ये बांधकाम कामगारांसाठी कायदा झाला असून महाराष्ट्रात १ मे २०११ मध्ये मंडळ स्थापन झाले. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासह महाराष्ट्र शासन उदासीन आहे. एकही बांधकाम कामगार नोंदणी व लाभापासून वंचित राहू नये, असे सांगत सर्व बांधकाम कामगारांनी नावाची नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार संघटना (आयटक) ची तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी ऋषी शास्त्रकार, उपाध्यक्ष पुंडलिक घोडाम, देवेंद्र राऊत, सचिव गुणाजी खरकाटे, सहसचिव प्रकाश चापले, क्षीरसागर, सोनकुसरे, कोषाध्यक्ष पुरूषोत्तम जौजाळकर, सल्लागार डॉ. महेश कापुलवार, अ‍ॅड. जगदीश मेश्राम तर सदस्यपदी दामोदर चिलबुले, नानाजी राऊत, दिवाकर गरमळे, तुळशिदास ठाकरे, तांबट शहा, सुरेश सोरते, बबन शिलार, देवराव धाडसे, भास्कर बावणे, कालिदास चौके, लालाजी बावणे, अशोक गेडाम, बबन कुनघाडकर, राकेश मेश्राम, सुरेश सोनटक्के, रवींद्र बावणे यांची निवड करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)