शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भेंडाळा-रामाळा मार्गाचे काम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:01 IST

काम सुरू झाल्यानंतर एक आठवडा टाकलेली गिट्टी रस्त्यावर तशीच पडून होती. त्यावेळी काम झाले असते तर या गिट्टीचा ये-जा करणाऱ्यांना त्रास झाला नसता. मात्र कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम लांबणीवर पडले. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाची संचारबंदी असल्याने सदर रस्त्यासाठी लागणाऱ्या डांबराचा पुरवठा होत नसल्याने हे काम रखडले असल्याची माहिती कंत्राटदाराकडून मिळाली.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे रखडले डांबरीकरण : परिसरातील नागरिकांना त्रास; रस्ता दुरूस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा-रामाळा या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम लॉकडाऊनपूर्वी सुरू झाले होते. दरम्यान कंत्राटदाराने सुरूवातीला या रस्त्यावर मोठी गिट्टी टाकून चुरी पसरविली. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम रखडले आहे.काम सुरू झाल्यानंतर एक आठवडा टाकलेली गिट्टी रस्त्यावर तशीच पडून होती. त्यावेळी काम झाले असते तर या गिट्टीचा ये-जा करणाऱ्यांना त्रास झाला नसता. मात्र कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम लांबणीवर पडले. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाची संचारबंदी असल्याने सदर रस्त्यासाठी लागणाऱ्या डांबराचा पुरवठा होत नसल्याने हे काम रखडले असल्याची माहिती कंत्राटदाराकडून मिळाली. पावसाळ्याला सुरूवात झाली असून आता पावसाळ्यात हे काम पूर्ण होणे शक्य होत नाही. सदर रस्त्यावरील टाकलेली गिट्टीची योग्यरित्या विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. अस्ताव्यस्त पडलेल्या गिट्टीमुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर याच मार्गाने बाहेरगावचे विद्यार्थी भेंडाळा येथे ये-जा करतात. त्यामुळे गिट्टी उचलण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.सदर रस्त्याचे काम लॉकडाऊनपूर्वी सुरू झाले होते. मात्र लॉडाऊनमुळे हे काम ठप्प पडले. डांबराचा पुरवठा होत नसल्याने आताच या कामाची सुरूवात करू शकत नाही. सप्टेंबर महिन्यापासून डांबरीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होईल. सदर रस्त्यावर जी गिट्टी उखडली आहे. ती उचलण्यासाठी दोन दिवसांपूर्वी मी संबंधित कंत्राटदाराला सांगितले होते. लवकरच गिट्टी उचलण्यात येईल.- भाऊसाहेब गौरकार,कनिष्ठ अभियंता, जि.प.उपविभाग, चामोर्शी

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक