शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ पदभरतीत ‘आळीपाळी’ शब्दाने केला ओबीसींचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

गोंडवाना विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आदी संवर्गातील प्राध्यापकांची पदभरती प्रक्रिया राबविली जात आहे. जवळपास प्राध्यापकांची ३६ पदे भरली जात असताना यामध्ये ओबीसी संवर्गासाठी एकही पद राखीव असल्याचे दिसून येत नाही.

ठळक मुद्देओबीसी महासंघाचा आरोप : ३६ पदांमध्ये ओबीसींना ठेंगा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात प्राध्यापकांची पदभरती प्रक्रिया राबविली जात आहे. या पदभरतीकरिता लावलेल्या बिंदुनामावलीत विशिष्ट प्रवर्गासाठी ‘आळीपाळी’ने एक पद असे निश्चित केले आहे. याच आळीपाळी शब्दाने ओबीसी संवर्गातील उमेदवारांचा घात केला असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी केला आहे.गोंडवाना विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आदी संवर्गातील प्राध्यापकांची पदभरती प्रक्रिया राबविली जात आहे. जवळपास प्राध्यापकांची ३६ पदे भरली जात असताना यामध्ये ओबीसी संवर्गासाठी एकही पद राखीव असल्याचे दिसून येत नाही. या संदर्भात कुलपती तथा महामहीम राज्यपाल यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण व संबंधित विभागाच्या मंत्र्यांना निवेदन देऊन ओबीसींवरील अन्याय दूर करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे. मात्र अजूनपर्यंत शासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याने ओबीसींमध्ये शासनाप्रती रोष व्यक्त केला जात असल्याची माहिती प्रा.येलेकर यांनी दिली.मिळालेल्या माहितीनुसार, गोंडवाना विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ३६ पदांकरिता राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने प्रमाणित केलेल्या बिंदूनामावलीनुसार, विशिष्ट काही प्रवर्गांना एकत्रीत करून १ पद राखीव करून आळीपाळीने असा शब्द प्रयोग केला आहे. राज्य शासनाने प्रमाणित केलेल्या बिंदुनामावलीतील ‘आळीपाळी’ या शब्दाचा अर्थ काय? असा प्रश्नही प्रा. येलेकर यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच संबंधीत बिंदुनामावलीच्या खाली चार पदांसाठी आरक्षण निश्चित करून दिले आहे. त्यात राज्यात ओबीसींना १९ टक्के आरक्षण असतानाही एकही पद दर्शविण्यात आले नाही. त्यामुळे या आळीपाळी या शब्दाचा अर्थबोध होत नसल्याचा आरोपही ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर यांनी केला आहे.बिंदूनामावलीसाठी शासन निर्णयच नाहीविशेष बाब म्हणजे २२ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार पदभरतीसाठी निर्मगीत केलेल्या २१ ऑगस्ट २०१९ च्या निर्णयाला स्थगीती देण्यात आली आहे. याचाच अर्थ सध्या पदभरतीसंदर्भात बिंदुनामावली तयार करण्याकरिता कोणताही शासन निर्णय नाही. तरीही राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने कोणत्या शासन निर्णयाच्या आधारे विशिष्ट संवर्गासाठी एक पद आळीपाळीने राखीव घोषित करून पदाचे आरक्षणही निश्चित केले आहे? असा प्रश्न प्रा.येलेकर यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालय