बेतकाठीत महिला दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:39 AM2021-03-09T04:39:47+5:302021-03-09T04:39:47+5:30

- तालुक्यातील बेतकाठी येथे धनंजय स्मृती माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, बेतकाठी ...

Women's Day in Bethlehem | बेतकाठीत महिला दिवस

बेतकाठीत महिला दिवस

googlenewsNext

- तालुक्यातील बेतकाठी येथे धनंजय स्मृती माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, बेतकाठी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

जागतिक महिला दिनानिमित्त विद्यालयात चित्र काढणे, विविध खेळांमध्ये लंगडी, फुगडी, संगीत खुर्ची व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेतकाठीच्या सरपंच कुंतीबाई हुपुंडी हाेत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य एस. सी. रामटेके, केंद्रप्रमुख करंबे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल राऊत, आर. डी. गायधनी, पी. बी. वासनीक, एच. एम. मुगंनकर, कौशल्य शैक्षणिक मंचचे संयोजक अनिल रोहित, छायाताई अंबादे, गुलाबबाई कुंजाम, आर. ए. कापगते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. बी. नागपुरे, प्रास्ताविक एच. एच. बिसेन यांनी केले, तर विनोद कोरेटी यांनी आभार मानले. या कार्यक्रमात दोन्ही विद्यालयांचे विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Women's Day in Bethlehem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.