शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी आर्थिकदृष्ट्या संक्षम व्हावे!

By admin | Updated: March 9, 2017 01:38 IST

महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध योजना राबवित आहे. स्त्रि ही शिक्षित होणे गरजेचे असून

सूर्यकांत शिंदे यांचे प्रतिपादन : जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन गडचिरोली : महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध योजना राबवित आहे. स्त्रि ही शिक्षित होणे गरजेचे असून त्याशिवाय विविध योजनांचा तीला उपयोग करुन घेता येणार नाही. यातून ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज, असे प्रतिपादन गडचिरोलीचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यानी केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात महिला मतदार जागृती अभियान कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा न्यायाधिश यू. एम. पदवाड, एस. पी. सुर, रेहपाडे, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, सहाय्यक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, एस. राममूर्ती, डॉ विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, माविमच्या व्यवस्थापक कांता मिश्रा, उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, सुनील चडगुलवार आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना न्या. शिंदे म्हणाले, महिलांच्या न्याय हक्कासाठी कायदे आहेत. परंतु खऱ्या अर्थाने महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय महिलांना समाजात ताठ मानेने जगता येणार नाही. तरी शासनाच्या सर्वंकष योजना तळागाळापर्यंत पोहचविणे हे शासकीय यंत्रणाची महत्त्वाची भूमिका आहे. असेही ते म्हणाले. न्या. पदवाड, एसडीओ कौस्तुभ दिवेगावकर, कांता मिश्रा, माधुरी काटमांडे, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे यांनी मार्गदर्शन केले. संचालन ज्योती तायडे यांनी तर आभार माधुरी आटमांडे यांनी मानले. शासकीय योजनांची माहिती स्थानिक भाषेतून अवगत करणार- जिल्हाधिकारी महिला ही सर्व क्षेत्रात आज अग्रेसर आहे. तीच्याकडे सन्मानाने समाजानी बघण्याचा हा दिवस असून तसा आपण संकल्प करु या, असे आवाहन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केले. गडचिरोली हा आदिवासीबहूल जिल्हा असून बहुसंख्य नागरिक गोंडी व माडीया भाषेत बोलतात. अशा नागरिकांना शासकीय योजनांची माहिती त्यांच्या स्थानिक भाषेत अवगत करून देण्यात येईल, असा प्रशासनाचा निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.